TRENDING:

उन्हाळ्यात आरोग्यासाठी फायदेशीर टरबूज अन् डाळिंबाचे ज्यूस, कमी साहित्यात घरीच बनावा झटपट, Video

Last Updated:

टरबूज आणि डाळिंबाचे ज्यूस उन्हाळ्यात शरिरासाठी फायदेशीर असतं. टरबूज आणि डाळिंबाचे ज्यूस कसं बनवायचं? याचीच रेसिपी आपल्याला मेघना देशपांडे यांनी सांगितली आहे. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी 
advertisement

छत्रपती संभाजीनगर : उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. कडक उन्हामध्ये आपण आपल्या शरिराला थंड ठेवण्यासाठी काहींना काही तर थंड पेय घेतं असतो. टरबूज आणि डाळिंबाचे ज्यूस उन्हाळ्यात शरिरासाठी फायदेशीर असतं. टरबूज आणि डाळिंबाचे ज्यूस कसं बनवायचं? याचीच रेसिपी आपल्याला मेघना देशपांडे यांनी सांगितली आहे.

ज्यूससाठी लागणारे साहित्य

advertisement

एक टरबूज त्याचे काप करून घ्यायचे, एक डाळिंब, वाळलेली पुदिना पाने, चाट मसाला, काळ मीठ, बीटच खिस, भिजत ठेवलेला सब्ज्या बी, सोडा किंवा स्प्राईट किंवा कोल्ड ड्रिंक्स तुम्ही घेऊ शकता.

रणरणत्या उन्हात आत्मा होईल तृप्त, घरातच बनवा आंबट-गोड चवीचे पन्ह, अगदी सोपी रेसिपी

ज्यूस बनवायची कृती 

सर्वप्रथम हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात टाकायचं. यामध्ये सर्वप्रथम टरबूजचे काप टाकायचे. त्यानंतर त्यामध्ये डाळिंब टाकायचं. त्यानंतर वाळलेली पुदिनाचे पाने, काळे मीठ आणि बीट हे सर्व साहित्य टाकायचं. हे साहित्याचे प्रमाण आहे हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता. नंतर हे सर्व मिक्सरच्या भांड्यात टाकल्यानंतर मिक्सर स्पीड लहान ठेवून हे सर्व ब्लेंड करून घ्यायचं. यामध्ये बीट आपण यामुळे घातले आहे की टरबूज आणि डाळिंब यांना बारीक केल्यानंतर त्यांचा रंग बदलतो. म्हणून रंग येण्यासाठी यामध्ये आपण थोडसं किसलेला बीट घातलेला आहे. जर तुम्हाला गोड जास्त लागत असेल तर तुम्ही यामध्ये थोडीशी साखर देखील घालू शकतो.

advertisement

मिक्सरमधून हे सर्व साहित्य काढून घेतल्यानंतर ते गाळून घ्यायचं. ते यामुळे की त्यात कोणत्याही प्रकारची बी राहता कामा नये म्हणून गाळून घ्यावा. सर्व्ह करण्यासाठी एका ग्लास थोडेसे आईस क्यूब टाकायचे त्यानंतर हे तयार केलेलं सर्व ज्यूस त्यामध्ये टाकायचं आणि वरून चव येण्यासाठी थोडासा चाट मसाला टाकायचा.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
उन्हाळ्यात आरोग्यासाठी फायदेशीर टरबूज अन् डाळिंबाचे ज्यूस, कमी साहित्यात घरीच बनावा झटपट, Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल