डोंबिवली : हिवाळ्यात बाजारात अनेक प्रकारच्या भाज्या येत असतात. या हंगामी भाज्या आपल्या आरोग्यासाठी फार फायद्याच्या ठरतात. यापासून तुम्ही मिक्स भाजी तयार करू शकता. तुमच्या घरातील लहान मुलं भाज्या खाण्यासाठी कुरकुर करत असतील तर त्यांना तुम्ही ही भाजी बनवून खाऊ घालू शकता. याचीच रेसिपी आपल्याला डोंबवलीमधील गृहिणी नीती बुकाळे यांनी सांगितली आहे.
advertisement
मिक्स भाजी करण्यासाठी साहित्य
एक चिरलेला कांदा, टोमॅटो, थोडे गाजर तुकडे, पाव किलो फ्लॉवरचे तुकडे, दोन बटाटे, एक वाटी मटार, मसाला, गरम मसाला, आद्रक लसूण पेस्ट, कांद्याची पात आणि चवीपुरतं मीठ हे साहित्य लागेल.
हिवाळ्यात बनवा विदर्भ स्पेशल पाण्यातील गोळे, एकदम आवडीने खाल, पाहा संपूर्ण रेसिपी VIDEO
मिक्स भाजी बनवण्यासाठी कृती
सर्वप्रथम ज्यात भाजी बनवणार आहोत ते भांडे गॅसवर ठेवावे. पातेलं थोडं गरम झाल्यानंतर त्यामध्ये तीन चमचे तेल ओतून तेल गरम झाल्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा टाकून लाल होईपर्यंत शिजू द्यावा. त्यानंतर त्यामध्ये अद्रक, लसूण पेस्ट टाकून पुन्हा मिक्स करावं. दोन मिनिट परतल्यानंतर आता यामध्ये कांद्याची पात आणि मटार घालावी आणि झाकण ठेवून पाच मिनिटं चांगलं शिजू द्यावं.
पाच मिनिटांनी झाकण काढून त्यामध्ये फ्लॉवर, बटाटा, हळद, गाजर आणि मीठ घाला आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या. एक वाफ काढून घेतल्यानंतर आता आपल्या भाजीमध्ये टोमॅटो आणि इतर मसाले घाला आणि चवीपुरतं मीठ घालून भाजी व्यवस्थित परतवून घ्या. शेवटी यावर कोथिंबीर घालून सजवून घ्या. अशा पद्धतीने आपली मिक्स भाजी तयार आहे. तुम्ही चपाती किंवा भाकरीबरोबर भाजी खाऊ शकता.





