लागणारे साहित्य (Ingredients):
बारीक रवा (चिरोटी रवा): 1 वाटी
दूध: 2 वाट्या (रव्याच्या दुप्पट)
साखर: अर्धी वाटी (आवडीनुसार कमी-जास्त)
साय किंवा तूप: 2 मोठे चमचे
वेलची पूड: 1 छोटा चमचा
सारणासाठी: गुळ आणि ओलं खोबरं किंवा सुका मेवा
कृती (Step-by-Step Recipe):
1. दुधाला उकळी आणा: एका कढईत 2 वाट्या दूध गरम करायला ठेवा. त्यात १ चमचा तूप आणि साखर टाका. साखरेमुळे मोदकाच्या वरच्या आवरणाला छान चव येते.
advertisement
2. रवा मिक्स करा: दुधाला उकळी आली की गॅसची फ्लेम कमी करा. आता यात 1 वाटी भाजलेला बारीक रवा हळूहळू टाका आणि सतत ढवळत राहा जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत.
3. वाफ काढा: रव्याने सर्व दूध शोषून घेतल्यावर कढईवर 2-3 मिनिटे झाकण ठेवा. वाफेमुळे रवा छान फुलून येईल आणि मऊ होईल.
4. पीठ मळून घ्या: मिश्रण थोडे कोमट असतानाच एका परातीत काढून घ्या. हाताला थोडे तूप लावून हे पीठ 5 मिनिटे छान मळून घ्या. पीठ जितके मऊ मळाल, तितके मोदक छान येतील आणि फुटणार नाहीत.
5. मोदक वळा: आता या पिठाचे छोटे गोळे करून त्यात गुळ-खोबऱ्याचे सारण भरा. तुम्ही साच्याचा वापर करून किंवा आधी सांगितलेल्या 'टूथपिक ट्रिक' ने हाताने कळ्या पाडून मोदक तयार करू शकता.
रवा मोदक परफेक्ट होण्यासाठी खास टिप्स
रव्याची निवड: हे मोदक बनवण्यासाठी नेहमी 'बारीक रवा'च वापरा. जाड रवा असेल तर तो मिक्सरला एकदा फिरवून बारीक करून घ्या.
दुधाचा वापर: पाणी वापरण्याऐवजी दूध वापरल्यामुळे मोदक अधिक पांढरशुभ्र आणि रिच (Rich) लागतात.
मऊपणा: जर पीठ कोरडे वाटत असेल, तर मळताना थोडे कोमट दूध शिंपडा.
