पुणे : जंक फूड म्हंटल की पाणी पुरी ही आलीच. पाणीपुरी हा प्रत्येकाच्या आवडीचा पदार्थ आहे. अगदी लहानापासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण पाणीपुरी आवडीने खात असतात. शेव पुरी, रगडा पुरी असे वेगळे प्रकार आपल्याला पाणीपुरीमध्ये खायला मिळतात. असाच एक प्रकार पुण्यातील स्व वऱ्हाडी मिसळ या ठिकाणी मिळत आहे. या प्रकाराचे नाव मिसळ पाणीपुरी शॉट असून खवय्यांची गर्दी याठिकाणी पाहिला मिळते.
advertisement
पुण्यात कुठंच मिळत नाही असा प्रकार
पुण्यातील एरंडवणे परिसरात असलेली स्व वऱ्हाडी मिसळमध्ये मिसळ पाणीपुरी शॉट खायला मिळत आहे. स्व वऱ्हाडी मिसळच्या मालिक श्रद्धा मोरे या आहेत. अश्या प्रकारची पाणीपुरी मिसळ पुण्यात तुम्हाला कुठे ही खायला मिळत नाही. मिसळसाठी केला जाणारा रस्सा आणि दही टाकून ही मिसळ पाणीपुरी शॉट खाल्ली जाते.
कांद्याचा वापर न करता बनवा टेस्टी बटाट्याची चटणी, टिफिन बॉक्ससाठी बेस्ट पर्याय Video
कशी बनवतात मिसळ पाणीपुरी शॉट?
मिसळ पाणीपुरी शॉट ही संकल्पना गेली सहा वर्ष झालं सुरु आहे. नेहमीच्या ज्या पाणीपुरीच्या पुऱ्या असतात त्या मैदा आणि रव्या पासून बनवलेल्या असतात. परंतु ह्या ज्या पुऱ्या आहेत त्या कडधान्य, मका, तांदूळ डाळ आणि पुदिना फ्लेवर पासून बनवलेल्या आहेत. मिसळचा रस्सा, दही, मटकी, शेव, कांदा, लिंबू टाकून ही मिसळ पाणी पुरी शॉट बनवली जाते. या पुऱ्याची चव स्क्रिप्सी आणि कडक आहे. त्यामुळे लोकांचा चांगला प्रतिसाद ही पाणीपुरी खायला मिळत आहे. याची किंमत ही 95 रुपये इतकी आहे,अशी माहिती श्रद्धा मोरे यांनी दिली आहे.
कवठाची पारंपरिक चटणी 5 मिनिटांत घरीच कशी बनवाल? सोप्या रेसिपीचा पाहा Video
पाणीपुरी हा पदार्थ कुठेही सहजपणे मिळतो. फिरायला गेल्यावर लोक आवर्जून खात असतात. परंतु मिसळ शॉट पाणीपुरी ही तुम्हाला इतर कुठे ही पाहिला मिळत नाही. कारण हे एकमेव ठिकाण आहे जिथे तुम्हाला ही पाहिला मिळते.