ठाणे: सध्या पावसाळा सुरू आहे. त्यामुळे सगळ्यांनाच काहीतरी चटपटीत खायला आवडतं. भजी आणि वडी या गोष्टींनी जर तुम्ही कंटाळला असाल तर तुमच्यासाठी ही एक सोपी आणि नवीन रेसिपी आहे. चटपटीत मसाला कॉर्न सगळ्यांनाच आवडतात. बाहेर स्टॉलवर खायचं झाल्यास ते महाग मिळतात. त्यामुळं मक्यांची ही चटपटीत कॉर्न रेसिपी तुम्ही घरातच बनवू शकता. ठाणे येथील गृहिणी स्वरा नवाते यांनी ही रेसिपी सांगितली आहे.
advertisement
चटपटीत कॉर्नसाठी साहित्य
चटपटीत कॉर्नसाठी घरातीलच साहित्य आवश्यक आहे. उकडलेल्या मक्याचे दाणे एक वाटी, मसाला, गरम मसाला, हळद, मीठ, तेल, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि लिंबू हे साहित्य या चटपटीत रेसिपीसाठी आवश्यक आहे.
ठाण्यात याठिकाणी मिळतो स्पॅनिश चूरोस अन् वॉफल, रेस्टॉरंटची सर्वत्र चर्चा, हे आहे लोकेशन
कॉर्नची कृती
सर्वप्रथम उकडलेला मका थंड करा. गॅसवर कढई ठेवून कढई थोडी गरम होईपर्यंत तापवा. त्यानंतर कढईत थोडं तेल टाका. कढईतलं तेल तापल्यानंतर त्या तेलात आपले उकडलेले मक्याचे दाणे टाका. 5 मिनिटांनी परतून घेतल्यानंतर त्यात मसाला, हळद, गरम मसाला आणि मीठ टाकून परतून घ्या. पुन्हा पाच मिनिटे परतल्यानंतर त्यावर कोथिंबीर घाला आणि प्लेटमध्ये सर्व्ह करा. त्यावर लिंबू पिळला की टेस्ट आणखी चटपटीत लागते.
अशा पद्धतीने काही मिनिटांतच चटपटीत कॉर्न तयार होतात. तुम्ही हे नाश्तासाठी किंवा संध्याकाळी स्नॅक्सच्या वेळेस खाऊ शकता. हे चटपटीत कॉर्न लहान मुलांपासून मोठ्या माणसांनाही आडतात. त्यामुळे अगदी सोपी आणि काही मिनिटांत तयार होणारी ही रेसिपी घरात नक्कीच ट्राय करू शकता.