घरातील गृहिणी असो किंवा एकटं राहणारा बॅचलर, 'रोज रोज तेच काय खायचं?' या एकाच विचाराने अनेकजण इंटरनेटवर रेसिपी शोधायला जातात. पण तिथे इतके पर्याय मिळतात की कन्फ्युजन कमी होण्याऐवजी उलट वाढतंच जातं. जर तुमच्याही बाबतीत असं घडत असेल, तर आता टेन्शन घेण्याची गरज नाही. डिजिटल युगातील काही 'स्मार्ट ट्रिक्स' तुमची ही डोकेदुखी कायमची संपवू शकतात.
advertisement
तुमच्याकडे असलेल्या साहित्यातूनच शोधा डिश
आता तुम्हाला कोणत्याही विशिष्ट डिशचं नाव सर्च करण्याची गरज नाही. इंटरनेटवर सध्या असे काही भन्नाट प्लॅटफॉर्म्स आणि वेबसाईट उपलब्ध आहेत, जिथे तुम्हाला फक्त 'तुमच्याकडे काय आहे?' हे सांगायचं असतं. तुमच्या किचनमध्ये असलेले मोजके साहित्य आणि त्यातून बनणाऱ्या लज्जतदार रेसिपी एका क्लिकवर तुमच्यासमोर येतात.
या वेबसाईट कशा काम करतात?
समजा, तुमच्याकडे फक्त दोन बटाटे, टोमॅटो आणि काही बेसिक मसाले आहेत. तुम्ही या प्लॅटफॉर्मवर जाऊन या साहित्यांची नावे टाकता. काही सेकंदांतच ही वेबसाईट तुम्हाला बटाट्याची साधी भाजी, स्नॅक्स किंवा काही नवीन 'फ्यूजन' डिशेसची यादी देते. यामुळे रोजच्या जेवणातील तोचतोचपणा संपतो आणि काहीतरी भन्नाट पदार्थ ट्राय करायला मिळतो, ज्याचा तुम्ही याआधी विचारही केला नसेल.
चवीसोबत आरोग्याचीही काळजी
या प्लॅटफॉर्म्सचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे, हे केवळ रेसिपीचं नाव सांगत नाहीत, तर ती बनवण्याची 'स्टेप-बाय-स्टेप' पद्धतही समजावून सांगतात. त्यामुळे तुम्ही कुकिंगमध्ये एक्स्पर्ट नसाल तरीही हॉटेलसारखी डिश घरी बनवू शकता.
हेल्थ फिल्टर्स: तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल किंवा हेल्दी खायचं असेल, तर तुम्ही 'हाय प्रोटीन' किंवा 'लो कॅलरी' असे पर्याय निवडू शकता.
अन्न वाया जाण्यापासून बचाव: घरात असलेल्या उरल्यासुरल्या साहित्यातूनही काय चांगलं बनू शकतं, हे कळल्यामुळे अन्नाची नासाडी होत नाही.
झटपट आणि स्मार्ट कुकिंग
या डिजिटल मदतीमुळे तुमचा वेळ तर वाचतोच, पण किचनमध्ये काम करण्याचा उत्साहही वाढतो. जेव्हा साहित्यातून रेसिपी आपोआप मिळते, तेव्हा "काय बनवू?" या प्रश्नाचं ओझं मनावरून उतरतं आणि स्वयंपाक हा एक आनंददायी अनुभव ठरतो. तंत्रज्ञान आता फक्त ऑफिसच्या कामापुरतं मर्यादित राहिलेलं नाही, तर ते तुमच्या ताटापर्यंत पोहोचलं आहे. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही काय करायचं या आशेच्या नजरेने फ्रिजकडे पाहाल, तेव्हा या 'स्मार्ट' वेबसाईट्सची मदत घ्या आणि घरच्यांना सरप्राईज द्या.
स्मार्ट वेबसाईट म्हणजे कोणत्या?
तुम्ही AI जसे की ChartGpt, Gemini, Grok वरती तुमच्याकडे काय भाजी आहे ते टाका किंवा भाजीचं सामान एकत्र करुन फोटो टाका आणि विचारा की याचं काय बनवू? तो तुम्हाला स्वत:हून 2-4 रेसिपी सुचवेल.
