सततची आणि तीव्र वेदना
सामान्य कंबरदुखी विश्रांती घेतल्यावर किंवा औषधोपचारानंतर कमी होते. परंतु, कर्करोगामुळे होणारी वेदना सतत असते आणि विश्रांती घेतल्यावर ती आणखी वाढते.
रात्री वाढणारे दुखणे
वेदना दिवसापेक्षा रात्री जास्त जाणवत असल्यास आणि यामुळे झोपमोड होत असल्यास, हे स्पाइनल मेटास्टॅसिस म्हणजेच कर्करोगाच्या अस्थींमधील प्रसाराचे लक्षण असू शकते.
प्रोस्टेट कर्करोगाशी संबंध
advertisement
प्रोस्टेट कर्करोग हा पुरुषांमध्ये होणारा एक सामान्य कर्करोग आहे, जो पसरल्यावर सर्वात आधी मणका आणि हाडांमध्ये जातो. यामुळे कंबरदुखी सुरू होते.
लघवीच्या सवयींमध्ये बदल
कंबरदुखीसोबत जर तुम्हाला लघवी करताना त्रास होणे, वारंवार लघवीला जावे लागणे किंवा लघवीत रक्त दिसणे अशी लक्षणे आढळल्यास, ते प्रोस्टेट कर्करोगाचे थेट संकेत असू शकतात.
अचानक वजन कमी होणे
कंबरदुखीच्या कारणाशिवाय जर तुमचे वजन अचानक कमी होत असेल, थकवा जाणवत असेल किंवा ताप येत असेल, तर त्वरित तपासणी करणे आवश्यक आहे.
डॉक्टरांचा त्वरित सल्ला
पुरुषांनी, विशेषतः 50 वर्षांवरील व्यक्तींनी, तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकणाऱ्या कंबरदुखीकडे दुर्लक्ष करू नये. त्वरित ऑन्कोलॉजिस्ट किंवा सामान्य तज्ञांचा सल्ला घ्यावा. लवकर निदान झाल्यास उपचार अधिक प्रभावी ठरतात. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)