जीवनशैलीतले बदल आरोग्याशी थेट संबंधित आहेत. त्यात कोणतेही बदल झाले की आरोग्यविषयक समस्या उद्भवतात. खाण्याच्या सवयींपासून ते जीवनशैलीतल्या बदलांमुळे वजन वाढणं ही समस्या प्रामुख्यानं जाणवते.
वजन वाढतं तेव्हा, शरीराला विविध आजारांचा धोका वाढतो. वजन कमी करायचं असेल तर आणि तंदुरुस्त राहायचं असेल तर ते आव्हान म्हणून स्वीकारायला हवं. ध्येय साध्य करण्याच्या प्रयत्नांनीच तेच शक्य होतं.
advertisement
Skin Care : हिवाळ्यासाठी आयुर्वेदिक टिप्स, खास विंटर स्पेशल फेसपॅक बनवून पाहा
मजबूत आणि निरोगी राहण्यासाठी दैनंदिन दिनचर्या व्यवस्थित पाळणं आवश्यक आहे. चेन्नईतील फिटनेस ट्रेनर राज गणपती यांनी निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी पाच सोप्या दैनंदिन सवयी सांगितल्यात. ज्यामुळे वजन देखील नियंत्रित राहण्यास मदत होते.
उत्साही सकाळ आणि आरामदायी संध्याकाळ - दिनचर्येत संतुलन साधण्यासाठी सकाळ अधिक सक्रिय आणि संध्याकाळ आरामदायी असणं आवश्यक आहे असं फिटनेस ट्रेनर राज गणपती यांनी सांगितलंय. यामुळे, दिवसा जास्त काम करता येतं आणि संध्याकाळी आराम मिळतो, ज्यामुळे शरीरात कॉर्टिसोलची पातळी वाढते आणि दिवस सक्रिय राहणं शक्य होतं.
प्रत्येक जेवणात प्रथिनं - प्रत्येक जेवणात प्रथिनं आवश्यक असतात. शाकाहारी किंवा मांसाहारी जेवण असलं तरी प्रथिनं आवश्यक असल्याचं फिटनेस ट्रेनर राज गणपती यांनी म्हटलंय. जेवणात नेहमीच प्रथिनं असावीत असा सल्ला त्यांनी दिलाय.
Obesity : वजन कमी करायचंय ? या दैनंदिन सवयींमुळे वजन येईल आटोक्यात
सात तासांची झोप - दररोज सात तासांची झोप घेणं अत्यंत महत्त्वाचं असल्याचं त्यांनी म्हटलंय. रात्रीची झोप पूर्ण झाली नाही तर दिवसा डुलकी घेणं महत्त्वाचं आहे. दिवसातून किमान तास तासांची झोप घेणं आरोग्यासाठी आणि अनेक आजारांना प्रतिबंधित करण्यास देखील मदत करते.
स्ट्रेंथ ट्रेनिंग - निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी आठवड्यात स्ट्रेंथ ट्रेनिंग आवश्यक आहे. स्ट्रेंथ ट्रेनिंग कधीही चुकवू नका असं त्यांनी सांगितलंय. यात स्नायूंना बळकट करण्यासाठी क्षमतेनुसार वजन उचलणं तसंच रेझिस्टन्स बँडचा वापर करा असा सल्ला त्यांनी दिला आहे.
