Skin Care : हिवाळ्यातही राहिल चेहऱ्यावरचा ग्लो कायम, आठवड्यातून दोनदा वापरा खास फेसपॅक
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
वाढणाऱ्या थंड हवेमुळे त्वचेतला ओलावा कमी होतो आणि त्वचा कोरडी होते. कोरड्या त्वचेसाठी विंटर फेसपॅकबद्दल जाणून घेऊया. विंटर स्पेशल फेस पॅकमुळे हिवाळ्यातही त्वचेवरचा ग्लो कायम राहिल. आयुर्वेदिक डॉक्टर शोभना यांनी हा व्हिडिओ इंस्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे.
मुंबई : डिसेंबर महिना संपत आलाय आणि अनेक भागात थंडी वाढतेय. वाढणाऱ्या थंड हवेमुळे त्वचेतला ओलावा कमी होतो आणि त्वचा कोरडी होते. कोरड्या त्वचेसाठी विंटर फेसपॅकबद्दल जाणून घेऊया.
विंटर स्पेशल फेस पॅकमुळे हिवाळ्यातही त्वचेवरचा ग्लो कायम राहिल. आयुर्वेदिक डॉक्टर शोभना यांनी हा व्हिडिओ इंस्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे.
विंटर स्पेशल फेस पॅकसाठी साहित्य- एक चमचा मसूर, एक चमचा ओट्स, केशराचे 8-10 धागे, एक चमचा बेसन, एक टेबलस्पून तांदळाचं पीठ, पाव कप कस्तुरी हळद, बटाट्याचा रस, दोन टेबलस्पून दही असं साहित्य लागेल.
advertisement
फेसपॅक बनवण्यासाठी एक टेबलस्पून मसूर डाळ, एक टेबलस्पून ओट्स आणि केशराच्या काड्या बारीक वाटून घ्या. ही पावडर एका भांड्यात ठेवा आणि त्यात एक टेबलस्पून बेसन, एक टेबलस्पून तांदळाचं पीठ, पाव कप हळद, बटाट्याचा रस आणि दोन टेबलस्पून दही घाला. हे साहित्य चांगलं मिसळा फेस पॅक तयार होईल.
advertisement
हा फेसपॅक चेहऱ्यावर लावा, चांगलं स्क्रब करा आणि वीस मिनिटं तसंच राहू द्या. नंतर, चेहरा धुवा. यामुळे त्वचा एक्सफोलिएट होते, हा फेस पॅक टॅनिंग काढून टाकण्यासाठी आणि त्वचेला मॉइश्चराइझ ठेवण्यासाठी खूप उपयुक्त आहे. आठवड्यातून दोनदा हा फेस पॅक लावता येतो. कोणतीही एलर्जी असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 24, 2025 8:44 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Skin Care : हिवाळ्यातही राहिल चेहऱ्यावरचा ग्लो कायम, आठवड्यातून दोनदा वापरा खास फेसपॅक











