Mouth Odour : तोंडातून वास का येतो ? लगेच उपचार करणं शक्य आहे का ? दंतवैद्यांनी सांगितलेत उपचार

Last Updated:

तोंडातून वास येत असेल तर लगेचचा उपाय म्हणून बरेच जण महागड्या टूथपेस्टनं दात घासतात आणि माउथवॉश वापरतात, पण तरीही तोंडाची दुर्गंधी दूर होत नाही. यासाठी दंतवैद्यांनी दिलेली महत्त्वाची माहिती पाहूया. 

News18
News18
मुंबई : रोज सकाळी आणि रात्री झोपण्याआधी दात घासले तरीही तोंडातून वास येत असेल तर ही माहिती नक्की वाचा.
तोंडातून वास येत असेल तर लगेचचा उपाय म्हणून बरेच जण महागड्या टूथपेस्टनं दात घासतात आणि माउथवॉश वापरतात, पण तरीही तोंडाची दुर्गंधी दूर होत नाही. यासाठी दंतवैद्यांनी दिलेली महत्त्वाची माहिती पाहूया.
जीभ स्वच्छ करा - तोंडाच्या दुर्गंधीचं मुख्य कारण बहुतांश वेळा जीभेतून येतं. जिभेच्या पृष्ठभागावर बॅक्टेरिया, अन्नाचं कण आणि मृत पेशी जमा होतात, ज्यामुळे दुर्गंधी येते. म्हणून, दररोज सकाळी आणि रात्री दात घासल्यानंतर टंग क्लीनरनं जीभ स्वच्छ करणं अत्यंत महत्वाचं आहे. यामुळे बॅक्टेरिया कमी होतात आणि श्वास ताजा राहतो.
advertisement
भरपूर पाणी प्या - कोरडं तोंड हे दुर्गंधीचं एक मुख्य कारण आहे. लाळेचं उत्पादन कमी असतं तेव्हा बॅक्टेरिया वेगानं वाढतात. म्हणून, दिवसभर भरपूर पाणी प्या. यामुळे तोंड हायड्रेटेड राहतं आणि लाळेचं उत्पादन वाढायला मदत होते, ज्यामुळे तोंडाची दुर्गंधी कमी होते.
advertisement
दातांची स्वच्छता - दातांवर प्लाक आणि टार्टर जमा झाल्यामुळेही तोंडाची दुर्गंधी वाढते. दात घासल्यानं हे थर पूर्णपणे जात नाहीत. म्हणूनच, दात आणि हिरड्या निरोगी राहाव्यात यासाठी दर सहा महिन्यांनी दंतवैद्याकडे जाऊन दंत स्वच्छता करणं महत्वाचं आहे.
advertisement
या सगळ्यानंतरही तोंडातून वास येत राहिला तर त्याचं कारण अंतर्गत असू शकतं. सायलेंट अ‍ॅसिड रिफ्लक्स, टॉन्सिल स्टोन, व्हिटॅमिनची कमतरता, हिरड्यांचे आजार किंवा पोटाच्या समस्या अशी कारणं असू शकतात. तोंडाची दुर्गंधी कधीकधी गंभीर आरोग्य समस्येचं पहिलं लक्षण असू शकतं. त्यामुळे दंतवैद्याचा सल्ला त्वरित घ्या.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Mouth Odour : तोंडातून वास का येतो ? लगेच उपचार करणं शक्य आहे का ? दंतवैद्यांनी सांगितलेत उपचार
Next Article
advertisement
CM Devendra Fadnavis On Thackeray Alliance:  ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी शाल...'
ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी श
  • ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी श

  • ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी श

  • ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी श

View All
advertisement