Cost, Price आणि Value तिघांचाही अर्थ एक समजण्याची चूक करु नका; कोणता कधी वापरायचा समजून घ्या, नाहीतर चारचौघात होईल Insult

Last Updated:

हो तुम्ही बरोबर वाचलत. तुम्ही जरी सहजच एखाद्या गोष्टीची प्राईस, कॉस्ट किंवा वॅल्यू विचारत असाल तर तुम्ही चुकीच्या गोष्टींसाठी चुकीचा शब्द नक्कीच वापरत असणार. चला यामधील फरक आणि कोणता शब्द कधी वापरायचा समजून घ्या.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : दैनंदिन जीवनात खरेदी करताना किंवा व्यवसायाबद्दल बोलताना आपण 'प्राईस' (Price), 'कॉस्ट' (Cost) आणि 'वॅल्यू' (Value) हे तीन शब्द अनेकदा एकाच अर्थाने वापरतो. पण अर्थशास्त्राच्या आणि व्यवहाराच्या भाषेत या तिन्ही शब्दांमध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे.
हो तुम्ही बरोबर वाचलत. तुम्ही जरी सहजच एखाद्या गोष्टीची प्राईस, कॉस्ट किंवा वॅल्यू विचारत असाल तर तुम्ही चुकीच्या गोष्टींसाठी चुकीचा शब्द नक्कीच वापरत असणार. चला यामधील फरक आणि कोणता शब्द कधी वापरायचा समजून घ्या.
समजा, तुम्ही एक कप चहा पिताय. त्या चहासाठी तुम्ही 10 रुपये दिले, तो चहा बनवण्यासाठी हॉटेलवाल्याला ५ रुपये लागले आणि तो चहा प्यायल्यावर तुम्हाला जे समाधान मिळालं, ते अनमोल होतं. या एका उदाहरणातच किंमत, खर्च आणि मूल्य दडलेलं आहे. चला तर मग, गोंधळ दूर करण्यासाठी या तिन्ही संकल्पना सोप्या भाषेत समजून घेऊया.
advertisement
प्राईस, कॉस्ट किंवा वॅल्यू, दिसायला सारखे, पण अर्थ मात्र वेगळे
बऱ्याचदा आपण म्हणतो, या वस्तूची कॉस्ट काय आहे? किंवा याची व्हॅल्यू खूप जास्त आहे. पण या शब्दांचा वापर करताना आपण तांत्रिक चुका करतो. हे शब्द समजून घेणं केवळ व्यापाऱ्यांसाठीच नाही, तर आपल्यासारख्या सामान्य ग्राहकांसाठीही गरजेचं आहे.
1. कॉस्ट (म्हणजे खर्च) :
जे बनवण्यासाठी लागतं, म्हणजे एखादी वस्तू किंवा सेवा तयार करण्यासाठी उत्पादकाला लागलेला एकूण पैसा.उदाहरण: जर एखादी कंपनी मोबाईल बनवत असेल, तर त्यासाठी लागणारे सुटे भाग, मजुरी, वीज बिल आणि जाहिरात यासाठी जे पैसे मोजले जातात, त्याला 'कॉस्ट' (Cost) म्हणतात.
advertisement
सोप्या भाषेत, वस्तू बाजारात येण्यापूर्वी तिच्यावर जो पैसा खर्च होतो, तो म्हणजे 'खर्च'.
2. प्राईस(म्हणजे किंमत) :
जे तुम्ही मोजता ते म्हणजे ती रक्कम, जी ग्राहक ती वस्तू खरेदी करण्यासाठी विक्रेत्याला देतो. उदाहरण: मोबाईल बनवण्याचा खर्च 10,000 रुपये असेल, तर कंपनी तो नफा मिळवण्यासाठी 15,000 रुपयांना विकते. ही 15,000 रक्कम म्हणजे त्या वस्तूची 'प्राईस' (Price) किंवा किंमत होय.
advertisement
किंमत ही नेहमी बाजारपेठ, स्पर्धा आणि मागणीवर ठरत असते.
3. वॅल्यू (म्हणजे मूल्य) :
जे तुम्हाला मिळतं ते मूल्य ही सर्वात महत्त्वाची आणि थोडी मानसिक संकल्पना आहे. मूल्य म्हणजे ती वस्तू वापरल्यावर ग्राहकाला मिळणारे समाधान किंवा उपयोगिता. उदाहरण: तहानलेल्या माणसाला पाण्याच्या बाटलीची किंमत 20 रुपये वाटेल, पण त्या पाण्याचे 'मूल्य' त्याच्यासाठी त्या क्षणी 20 रुपयांपेक्षा कितीतरी जास्त असते.
advertisement
याउलट, जर एखादी महागडी वस्तू तुमच्या काहीच कामाची नसेल, तर तिची किंमत जास्त असूनही तुमच्यासाठी तिची व्हॅल्यू शून्य असते.
वॉरन बफे यांचे एक प्रसिद्ध वाक्य आहे, Price is what you pay. Value is what you get. (प्राईस म्हणजे जे तुम्ही देता आणि वॅल्यू म्हणजे जे तुम्हाला मिळते.)
आपण कुठे चुकतो?
आपण अनेकदा 'स्वस्त' वस्तूला 'व्हॅल्यू फॉर मनी' समजतो. पण एखादी वस्तू कमी किमतीत (Price) मिळत असेल आणि ती दोन दिवसात खराब झाली, तर तिचे मूल्य (Value) कमी होते. याउलट, एखादी वस्तू महाग असूनही जर ती वर्षानुवर्षे साथ देत असेल, तर तिची किंमत जास्त असली तरी तिचे मूल्य जास्त असते.
advertisement
पुढच्या वेळी कोणतीही गोष्ट खरेदी करताना स्वतःला विचारा "मी याची फक्त किंमत मोजतोय की मला यातून योग्य मूल्य मिळणार आहे?" खर्च आणि किंमत हे आकड्यांमध्ये मोजता येतात, पण मूल्य हे तुमच्या समाधानावर अवलंबून असतं.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Cost, Price आणि Value तिघांचाही अर्थ एक समजण्याची चूक करु नका; कोणता कधी वापरायचा समजून घ्या, नाहीतर चारचौघात होईल Insult
Next Article
advertisement
CM Devendra Fadnavis On Thackeray Alliance:  ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी शाल...'
ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी श
  • ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी श

  • ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी श

  • ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी श

View All
advertisement