तज्ज्ञ काय सांगतात?
याबाबत ऑप्टोमेट्रिस्ट आणि कॉन्टॅक्ट लेन्स एक्सपर्ट डॉक्टर सांगतात की, चष्म्यावरून स्क्रॅच काढण्यासाठी टूथपेस्ट किंवा बेकिंग सोडा वापरणे बिलकुल योग्य नाही. असे केल्याने तुमच्या चष्म्याची कोटिंग (जसे की अँटी-रिफ्लेक्शन किंवा ब्लू ब्लॉक कोटिंग) खराब होऊ शकते आणि लेन्स आणखी खराब होऊ शकतात.
मग चष्म्यावरून स्क्रॅच कसे काढायचे?
डॉक्टर म्हणतात, तुमच्या चष्म्यावर स्क्रॅच आले असतील, तर सर्वात चांगला उपाय आहे की तुम्ही तुमच्या ऑप्टिशियनशी (चष्मे विकणाऱ्यांशी) संपर्क साधा. ते लेन्सची कोटिंग 'डी-कोट' करून पुन्हा 'रिकोट' करू शकतात. यामुळे वरच्या बाजूचे स्क्रॅच निघून जातात आणि लेन्स पुन्हा नव्यासारखे दिसू लागते. मात्र, जर स्क्रॅच खूप खोल असतील आणि लेन्सच्या आतल्या पृष्ठभागापर्यंत पोहोचले असतील, तर ते काढणे कठीण होते. अशा परिस्थितीत नवीन लेन्स लावणे हाच चांगला उपाय आहे.
advertisement
चष्म्यावर स्क्रॅच पडू नये म्हणून काय कराल?
- यासाठी डॉक्टर चष्म्याला नेहमी मजबूत प्रोटेक्टिव्ह केसमध्ये ठेवण्याचा सल्ला देतात.
- लेन्स साफ करण्यासाठी नेहमी मायक्रोफायबर कापड आणि खास लेन्स क्लीनिंग सोल्युशनचाच वापर करा.
- कंपनीने दिलेल्या स्वच्छता निर्देशांचे पालन करा आणि नियमितपणे हलक्या हातांनी चष्मा साफ करत राहा.
'या' चुका करणे टाळा
- कधीही पेपर टॉवेल, नॅपकिन किंवा कपड्याने चष्मा साफ करू नका. यामुळे लेन्सवर स्क्रॅच पडू शकतात.
- ग्लास क्लीनर, बाथरूम क्लीनर किंवा डिटर्जंट सारख्या घरगुती क्लीनरने चष्म्याची लेन्स साफ करू नका.
- चष्म्याला कधीही लेन्सच्या बाजूने खाली ठेवून ठेवू नका.
- चष्म्याला जास्त वेळ सूर्यप्रकाश किंवा उष्णतेमध्ये (जसे की कारच्या आत) सोडू नका. यामुळेही लेन्सची कोटिंग खराब होऊ शकते.
हे ही वाचा : डासांची फॅक्ट्री! कारखान्यात तयार केले जात आहेत डास, पण का? त्याचं करणार काय?
हे ही वाचा : तुमच्या मुलालाही मोबाईलचं व्यसन लागलंय? फाॅलो करा 'या' 6 सोप्या टिप्स, मुलांचं आरोग्य अन् भविष्य राहील सुरक्षित!