आधी सांगितल्याप्रमाणे अनेक जण जीममध्ये तासंतास वर्कआऊट करतात. पण त्याने काही फरक पडत नाही. किंवा वजन कमी करण्यासाठी वेगवेगळा व्यायाम करावा लागतो. फॅटलॉससाठी वेगळा व्यायाम, मसल्स किंवा बॉडी वाढवण्यासाठी वेगळा व्यायाम. मात्र आम्ही जर तुम्हाला सांगितलं की, शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या फिट राहण्यासाठी तुम्हाला फक्त 1 मिनिट व्यायाम करायचा आहे तर ? कदाचीत तुमचा विश्वास बसणार नाही. मात्र हे खरं आहे. अवघ्या 1 मिनिटाच्या शॉर्ट-बस्ट व्यायामामुळे तुम्हाला अनेक आरोग्यदायी फायदे होऊ शकतील.
advertisement
जाणून घेऊयात शॉर्ट-बस्ट व्यायामाचे फायदे:
हे सुद्धा वाचा :हिवाळ्यात रोज सकाळी फक्त 10 मिनिटं हा व्यायाम करा, दिवसभर राहाल फ्रेश अन् आरोग्यही राहील उत्तम
हृदयासाठी फायद्याचं :
अवघ्या एक मिनिटाच्या व्यायामामुळे हृदयाचं आरोग्य सुधारायला मदत होते. अनेक अभ्यासांमध्ये असं आढळून आलंय की, शॉर्ट-बस्ट व्यायामामुळे हृदयाचे ठोके वाढून रक्त प्रवाह सुधारायला मदत होते. यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो.
जास्त कॅलरी बर्न होतात:
जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर हा एक मिनिटांचा व्यायाम तुमच्यासाठी जास्त फायद्याचा ठरू शकतो. कारण यामुळे कॅलरीज जास्ते वेगाने बर्न होतात. या एक मिनिटात तुम्ही कोणत्याही प्रकारचा व्यायाम करा. दोरी ऊड्या मारा किंवा जोरात चाला किंवा जंपिंग जॅक सारखा व्यायाम करा. अट एकच जे करता ते जोरात करा. यामुळे चयापचय क्रिया वाढून चरबी जाळण्यास मदत होते.
हे सुद्धा वाचा :गरोदरपणात करा हे सोपे अन् सुरक्षित व्यायाम, आईसह बाळही राहील निरोगी!
मानसिक आरोग्यासाठी फायद्याचं:
एक मिनिटाचा व्यायाम केल्याने मानसिक आरोग्याला सुद्धा फायदा मिळतो. जोरात शारीरिक हालचाली केल्यामुळे मेंदूमध्ये एंडोर्फिन तयार होतं ज्यामुळे मूड आनंदी व्हायाला आणि तणाव कमी व्हायला मदत होतो.
स्नायूंची लवचिकता वाढते:
एका मिनिटाच्या व्यायामाने स्नायूदेखील मजबूत व्हायला मदत होते. एका मिनिटात वेगवेगळे व्यायाम करत असताना, स्नायूं सतर्क होतात आणि त्यांची वाढ होऊन ते बळकट व्हायला मदत होते. यामुळे शरीराची कार्यक्षमता सुधारते आणि स्नायूचं दुखणं कमी होऊ शकतं. एक मिनिटाच्या व्यायामाने शरीराची गतिशीलता वाढून तुम्ही दीर्घकाळ सक्रिय राहू शकता. असा व्यायाम हाडे आणि सांध्यासाठी देखील फायदेशीर आहे, कारण यामुळे रक्त प्रवाह वाढतो आणि हाडांची ताकद कायम राहते.