प्राध्यापक अशोक कुमार सांगतात की, दीर्घकाळ झोपेचा पॅटर्न बिघडलेला राहिल्यास शरीराचे जैविक घड्याळ म्हणजेच बायोलॉजिकल क्लॉक प्रभावित होते. याचा थेट परिणाम हार्मोन संतुलन, इम्युन सिस्टिम आणि पेशींच्या दुरुस्ती प्रक्रियेवर होतो. ज्यांची दिनचर्या अनियमित आहे आणि जे पुरेशी झोप घेत नाहीत, त्यांच्या शरीरात मेलाटोनिन हार्मोनची पातळी कमी होते. हेच हार्मोन कर्करोग पेशींच्या वाढीला रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.
advertisement
रिसर्चमध्ये काय आढळले?
प्राध्यापक अशोक कुमार यांनी डॉक्टर आशुतोष श्रीवास्तव, महेंद्र सिंह तोमर आणि डॉ. मोहित यांच्यासोबत मिळून हे संशोधन केले आहे. आंतरराष्ट्रीय ‘जनरल स्लीप मेडिसिन रिव्यूज’मध्ये प्रसिद्ध झालेल्या या संशोधनात समोर आलेल्या तथ्यांनुसार…
- उशिरा रात्रीपर्यंत जागणे, नाइट शिफ्ट आणि अनियमित दिनचर्या यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होते, ज्यामुळे कर्करोग पेशींना वाढण्याची संधी मिळते.
- संशोधनात हेही स्पष्ट झाले आहे की नियमित झोप, वेळेवर भोजन आणि संतुलित जीवनशैली कर्करोगापासून बचावात महत्त्वाची भूमिका बजावू शकते.
असा होईल कर्करोगाचा धोका कमी..
भोपाल एम्सच्या संशोधनातून हे स्पष्ट होते की, कर्करोगाची प्रतिबंधक उपाययोजना केवळ औषधांपुरती मर्यादित नाही तर जीवनशैलीत सुधारणा. जसे की, नियमित झोप, वेळेवर भोजन आणि संतुलित दिनचर्या.. कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत करू शकते. त्यामुळे जर तुम्ही झोपेला हलक्यात घेत असाल, तर सावध व्हा. कारण चांगली झोप केवळ थकवा दूर करण्यासाठीच नाही, तर गंभीर आजारांपासून बचावासाठीही अत्यंत आवश्यक आहे.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
