शास्त्र काय सांगतं याबरोबरच विज्ञान काय सांगतं हे देखील इथे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. आयुर्वेदानुसार, दुसऱ्या व्यक्तीसह एकाच ताटात जेवलं तर संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. तसंच एकत्र आणि उष्ट खाण्यानं तोंडाला वास येण्याचा त्रास होऊ शकतो.
1 किंवा 2 नाही तर 10 दिवस आधी मिळतात हार्ट ॲटॅकचे संकेत, शरिरात असं काय घडतं?
advertisement
ज्या व्यक्तीसह एकत्र जेवताय, त्या व्यक्तीला काही संसर्ग असेल आणि या व्यक्तीचं उष्ट अन्न तुम्ही खाल्लं तर तोंडामध्ये अल्सर होण्याची शक्यता जास्त असते. कारण त्याच्या लाळेबरोबर त्याला झालेला संसर्ग तुम्हालाही बाधित करू शकतो. सर्दी, खोकला, ताप आणि मौखिक आरोग्यासाठी एकत्र आणि उष्ट खाणं घातक ठरू शकतं.
तसंच, एकाच ताटात जेवलं आणि उष्टं खाल्लं तर तुम्हाला जेवणातली पोषक तत्वं कमी मिळतात. याचा परिणाम तुमच्या तब्येतीवर होऊ शकतो.
भावना महत्वाच्या असतातच पण त्यासोबत हा वैज्ञानिक दृष्टिकोन पण कायम लक्षात ठेवणं आवश्यक आहे.