1 किंवा 2 नाही तर 10 दिवस आधी मिळतात हार्ट ॲटॅकचे संकेत, शरिरात असं काय घडतं?
- Published by:sachin Salve
- trending desk
Last Updated:
हार्ट ॲटॅकपूर्वी कोणती लक्षणं दिसतात या बाबत माहिती घ्या आणि सतर्क व्हा.
मुंबई: आजकाल बदललेल्या जीवनशैलीमुळे अनेक गंभीर आजारांचा धोका वाढला आहे. हार्ट ॲटॅक हा ही असाच एक आजार आहे. तरुणांपासून ते ज्येष्ठापर्यंत सर्व वयोगटांत आता हार्ट ॲटॅकचा धोका जाणवतो. अनेकदा हार्ट ॲटॅक आल्यानंतर त्या रुग्णाला रुग्णालयात पोहोचून उपचार मिळण्याएवढा वेळही मिळत नाही असं दिसतं. त्यावरुनच हार्ट ॲटॅकची तीव्रता आपल्या लक्षात येऊ शकते. असे मृत्यू अकस्मात मृत्यू मानले जातात मात्र हार्ट ॲटॅक येण्याच्या साधारण 10 दिवस आधीपासूनच काही ना काही लक्षणं दिसू लागतात. वेळीच त्या लक्षणांची दखल घेऊन वैद्यकीय सल्ला घेतला तर हार्ट ॲटॅक टाळताही येऊ शकतो. हार्ट ॲटॅकपूर्वी कोणती लक्षणं दिसतात या बाबत माहिती घ्या आणि सतर्क व्हा.
मायोक्लिनिकच्या रिपोर्टनुसार हार्ट ॲटॅक येण्याच्या काही दिवस आधी छाती आणि आसपासच्या भागात एक विचित्र दाब जाणवतो. छातीत जळजळणं, भरल्यासारखं वाटणं, दुखणं ही लक्षणंही जाणवू शकतात. हार्वर्ड हेल्थ पब्लिशिंगच्या रिपोर्टनुसार हार्ट ॲटॅक येण्याच्या साधारण 10 दिवस आधी व्यक्तीला खूप थकवा जाणवण्यास सुरुवात होऊ शकते. नॅशनल हार्ट, ब्लड ॲंड लंग इन्स्टिट्यूटच्या मते पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये हे जास्त घडतं. हृदयाला पुरेसा रक्तपुरवठा होत नसेल तर त्या व्यक्तीला खूप घाम येऊ शकतो. अपचन, मळमळ जाणवू शकते. मात्र, ही लक्षणं किरकोळ समजून त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. तुम्हाला असा कोणताही त्रास जाणवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष न करता विश्रांती घ्यावी. डॉक्टरांचा सल्लाही घ्यावा. हृदयाला होणारा रक्तपुरवठा सुरळित नसेल तर अनेक त्रास होऊ शकतात. हार्टबीट्स वाढतात. हार्ट ॲटॅक येण्यापूर्वी त्या व्यक्तीच्या हृदयाचे ठोके वाढू शकतात.
advertisement
हार्ट ॲटॅक येण्यापूर्वीच्या लक्षणांमध्ये छाती, खांदे, हात, मान आणि जबडा दुखणं ही लक्षणंही आहेत. हृदयाची समस्या निर्माण होणार असेल तर रक्तावाहिन्या आखडतात. त्यामुळे शरीरात वेदना होऊ शकतात.
तुम्हाला सतत चक्कर येत असेल, गरगरत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करु नका. हे हार्ट ॲटॅकचं लक्षण असू
advertisement
शकतं. चक्कर, श्वास घ्यायला त्रास, डोकं किंवा छातीत दुखणं ही रक्तदाब कमी होण्याची पर्यायाने हार्ट ॲटॅक येण्याची लक्षणं असू शकतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 19, 2024 10:24 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
1 किंवा 2 नाही तर 10 दिवस आधी मिळतात हार्ट ॲटॅकचे संकेत, शरिरात असं काय घडतं?