पण दररोज जास्त वेळ इअरफोन वापरण्यानं कानांचं नुकसान होतं तसंच झोप आणि हार्मोनल संतुलन देखील बिघडू शकतं.
झोपण्यापूर्वी संगीत किंवा पॉडकास्ट ऐकणं ही सवय अनेकांना असते. पण इअरफोनद्वारे जास्त वेळ आवाज ऐकल्यानं मेंदू सतर्क राहतो, ज्यामुळे गाढ झोप येण्यास प्रतिबंध होतो.
Feet Care : कोमट पाण्याची किमया, स्नायूंना मिळेल आराम, झोपेची समस्या होईल दूर
advertisement
त्याचा परिणाम दुसऱ्या दिवशी जाणवतो. थकवा, चिडचिड आणि ऊर्जा कमी जाणवणं असे परिणाम जाणवतात. झोपेचा त्रास होत असेल तर झोपण्यापूर्वी इअरफोनचा वापर कमी करा.
हार्मोनल बॅलन्सवर परिणाम (इअरफोन आणि हार्मोन्स)
इअरफोन्समधून जास्त वेळ मोठा आवाज ऐकल्यानं स्ट्रेस हार्मोन कॉर्टिसोल वाढतं. यामुळे हृदयाचे ठोके वाढू शकतात, रक्तदाब वाढू शकतो आणि हळूहळू हार्मोनल असंतुलन होऊ शकतं. इतकंच नाही तर सतत इअरफोन लावल्यानं मेलाटोनिन हार्मोनची पातळी देखील बिघडू शकते. हे हार्मोन झोप येण्यास मदत करण्यासाठी उपयुक्त आहे.
Skin Care : दूध, फळांचे आईस क्युब आणतील चेहऱ्यावर चमक, वापरण्याची पद्धत आणि फायदे
यासाठी 60-60 च्या नियमानुसार इअरफोन वापरा - म्हणजेच एक तासापेक्षा जास्त वेळ सतत ऐकू नका आणि आवाज साठ टक्क्यांपेक्षा जास्त ठेवू नका.
झोपताना इअरफोनऐवजी स्पीकर किंवा व्हाईट नॉइज मशीन वापरा.
इअरफोनचा जास्त वापर विशेषतः मुलं आणि किशोरवयीन मुलांसाठी अधिक धोकादायक आहे. कारण त्याचा त्यांच्या मेंदूच्या विकासावर आणि हार्मोन्सवर परिणाम होऊ शकतो.