हिवाळ्यात पायांना भेगा पडू नये नयेत यासाठी काही सोप्या टिप्स
नारळाच्या तेलाचा वापर:-
नारळाच्या तेलामध्ये अँटिबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात. याशिवाय नारळाचं तेल त्वचेला हायड्रेट ठेवण्यास मदत करतं. रात्री झोपण्यापूर्वी पायांना खोबरेल तेल लावून हलक्या हाताने मसाज केल्याने भेगांच्या तक्रारी दूर तर होतातच मात्र त्वचाही कोमल राहायला मदत होते.
advertisement
शिया बटर आणि ग्लिसरीन:-
शिया बटर आणि ग्लिसरीनसारखे मॉइश्चरायझर्स खोलवर जाऊन पायांना ओलावा देतात. त्यामुळे त्वचा कोरडी पडत नाही आणि भेगांच्या समस्येपासून आराम मिळतो.
पायांची स्वच्छता:-
अनेक जण अनवाणी चालतात किंवा दिवसभर सॉक्स घातल्याने त्यांच्या पायांना घाम येतो. अशावेळी जर पाय स्वच्छ धुतले नाही तर जंतूसंसर्ग होण्याचा धोका असतो. त्यामुळे संसर्गाचा धोका टाळण्यासाठी बाहेरून आल्यानंतर पाय कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. यानंतर पायांना आणि टाचांना मॉइश्चरायझर किंवा क्रीम लावा. ज्यामुळे पाय कोमल आमि मुलायम राहतील आणि भेगा पडण्याचा धोका टाळता येईल.
घरगुती उपचार:-
मध, ऑलिव्ह ऑईल आणि लिंबू यांचे मिश्रण पायांवर लावल्याने त्वचा ओलसर राहते आणि भेगा भरण्यास मदत होते. त्यामुळे तुमच्या पायांना जर भेगा पडल्या असतील तर या घरगुती उपायाने पाय मऊ आणि निरोगी राहायला मदत होईल.
सुयोग्य आहार :-
त्वचेच्या देखभालीसाठी पोषण आहार घेणं फायद्याचं ठरतं. व्हिटॅमिन ई, झिंक आणि ओमेगा -3 फॅटी ॲसिडयुक्त हिरव्या भाज्या, फळं आणि मासं खाल्ल्यामुळे त्वचेला आवश्यक ती पोषण तत्त्वे मिळतात, ज्यामुळे पायांना भेगा पडण्याची शक्यता मावळते.