Ice Massage हा शब्द सध्या ट्रेंडमधे असला तरी, त्वचेसाठी गुणकारी म्हणून वापरली जाणारी ही एक जुनी पद्धत आहे. चेहऱ्यावर बर्फ चोळल्यानं रक्ताभिसरण सुधारतं, ज्यामुळे तुमच्या त्वचेला आवश्यक पोषक घटक आणि ऑक्सिजन मिळतो. याचा तुमच्या त्वचेवर थेट परिणाम होतो आणि चेहऱ्यावरची उघडी छिद्र म्हणजेच open poresशी संबंधित समस्या देखील कमी होतात. समजून घेऊया Ice Massage कसा फायदेशीर.
advertisement
Brain Health : तुमची ही सवय मेंदूला आवडत नाही, जाणून घ्या मेंदूचं आरोग्य
सूज : सकाळी उठल्यावर तुमचा चेहरा किंवा डोळे सुजलेले वाटत असतील, तर बर्फाचा तुकडा चोळल्यानं त्वरित आराम मिळेल.
मुरुमं : बर्फामुळे मुरुमांचा लालसरपणा आणि सूज कमी करण्यास मदत होते, ज्यामुळे ते लवकर सुकण्यास मदत होते.
चेहरा : यामुळे चेहऱ्यावरची उघडी छिद्र म्हणजेच open pores घट्ट करण्यास मदत होते, ज्यामुळे तुमची त्वचा नितळ दिसते.
सुरकुत्या : नियमित वापराने, बारीक रेषा आणि सुरकुत्या तयार होण्यास आळा बसतो.
Joints Pain : तारुण्यातही जाणवू शकते सांधेदुखी, या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका
मेकअप : मेकअप लावण्यापूर्वी बर्फ चोळल्यानं मेकअप जास्त काळ टिकण्यास मदत होते आणि त्वचेला नैसर्गिक चमक येते.
Ice Massage कसा करायचा?
स्वच्छ सुती कापड किंवा मऊ टॉवेल घ्या. एक किंवा दोन बर्फाचे तुकडे घ्या. बर्फाचे तुकडे कापडात गुंडाळा. तुमची त्वचा संवेदनशील असेल तर त्वचेवर बर्फ थेट लावू नका. कापडात गुंडाळलेला बर्फ तुमच्या चेहऱ्यावर गोलाकार फिरवा, हळूवारपणे घासा. कपाळावर, गालावर, हनुवटीवर आणि डोळ्यांखालील भागावर लक्ष केंद्रित करा. हे केवळ एक ते दोन मिनिटं करा. यामुळे त्वचा ताजीतवानी वाटेल.
