TRENDING:

Skin Care : संत्र्यांच्या सालाची पूड करेल किमया, उन्हाळ्यातलं टॅनिंग करेल दूर, पाहूया पूड बनवण्याची कृती आणि फायदे

Last Updated:

उन्हाळा सुरू होताच, टॅनिंग होऊ शकतं. कडक उन्हाचा सर्वाधिक परिणाम चेहरा, पाय, मान आणि हातांवर होतो. त्वचा काळी पडते तसंच उष्णता आणि घामामुळे चेहऱ्यावर मुरुम देखील येतात. यासाठी आयुर्वेदातल्या  एका नैसर्गिक स्क्रबची मदत होईल. यामुळे उन्हाळ्यात टॅनिंग कमी होईल आणि चेहराही फ्रेश दिसेल. पाहूया संत्र्यांच्या सालीच्या पावडरचा उपयोग कसा करायचा.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मार्च महिना मध्यावर आलाय आणि सूर्यही तळपायला लागलाय. त्यात तुम्हाला घराबाहेर पडायचं असेल तर टॅनिंग होऊ शकतं.
News18
News18
advertisement

उन्हाळा सुरू होताच, टॅनिंग होऊ शकतं. कडक उन्हाचा सर्वाधिक परिणाम चेहरा, पाय, मान आणि हातांवर होतो. त्वचा काळी पडते तसंच उष्णता आणि घामामुळे चेहऱ्यावर मुरुम देखील येतात. यासाठी आयुर्वेदातल्या  एका नैसर्गिक स्क्रबची मदत होईल. यामुळे उन्हाळ्यात टॅनिंग कमी होईल आणि चेहराही फ्रेश दिसेल. पाहूया संत्र्यांच्या सालीच्या पावडरचा उपयोग कसा करायचा.

advertisement

Avocado Paneer Toast : न्याहारी होईल लय भारी, अवॅकाडो पनीर टोस्टची चव न्यारी, नक्की ट्राय करा ही रेसिपी

सूर्याच्या किरणांपासून संरक्षण करण्यासाठी, त्वचा मेलेनिन नावाचं हार्मोन तयार करतं आणि कालांतरानं, त्याचा रंग असमान होतो. योग्य काळजी घेतली तर, टॅनिंग दूर करता येतं. टॅनिंग काढून टाकण्यासाठी संतुलन आणि पोषण आवश्यक आहे.

advertisement

नैसर्गिक स्क्रब बनवणं देखील सोपं आहे. संत्र्याच्या सालीची पावडर, थोडंसं केशर, ज्येष्ठमध पावडर आणि चंदन पावडर कोरफडीच्या गरामधे मिसळून मिश्रण तयार करा. मिश्रण जाड वाटत असेल तर गुलाबपाणी किंवा कच्चं दूध वापरु शकता. ही पेस्ट आठवड्यातून दोनदा टॅनिंग झालेल्या भागावर लावा.

Summer Drink : उन्हाळ्यात कोल्ड्रिंकचा मारा नको, या खास घरगुती पेयांनी करा डिहायड्रेशनपासून रक्षण

advertisement

या नैसर्गिक स्क्रबमधे मृत पेशी काढून त्वचा स्वच्छ करण्याची क्षमता आहे. यामुळे त्वचेचा रंग एकसारखा  होण्यासाठी आणि त्वचेला खोलवर पोषण देण्यासाठीही याची मदत होते. ज्येष्ठमधामुळे मेलेनिन संतुलित होतं आणि केशरामुळे त्वचा उजळ करण्यास मदत करते.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
द्राक्षला 12000 रुपये भाव, लिंबू दरही तेजीत, कांद्याची काय स्थिती? Video
सर्व पहा

या मिश्रणातील कोरफडीमुळे उष्णता कमी होते आणि खोलवर थंडावा मिळतो. ज्यामुळे त्वचेची जळजळ कमी होते. संत्र्यात व्हिटॅमिन सी असतं, ज्याचा उपयोग त्वचेच्या नवीन पेशी तयार करण्यासाठी होतो.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Skin Care : संत्र्यांच्या सालाची पूड करेल किमया, उन्हाळ्यातलं टॅनिंग करेल दूर, पाहूया पूड बनवण्याची कृती आणि फायदे
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल