आहारात फायबरचा समावेश
तुमच्या आहारात विरघळणारे फायबर असलेल्या पदार्थांचा समावेश करा. हे फायबर शरीरातील कोलेस्ट्रॉल शोषून घेण्यास मदत करते. जवस, सफरचंद, लिंबूवर्गीय फळे आणि सोयाबीन यांसारख्या पदार्थांमुळे कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.
निरोगी चरबी निवडा
असंतृप्त चरबी हृदयासाठी चांगली असते. तळलेले पदार्थ, प्रक्रिया केलेले अन्न आणि लाल मांस खाणे टाळा. त्याऐवजी अक्रोड, बदाम, जवस आणि ऑलिव्ह ऑइल यांचा वापर करा. यामुळे खराब कोलेस्ट्रॉल कमी होते.
advertisement
रोज 30 मिनिटे व्यायाम
नियमीत व्यायाम करणे खूप महत्त्वाचे आहे. दररोज कमीत कमी 30 मिनिटे चालणे किंवा धावणे हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. व्यायामाने शरीरातील चांगले कोलेस्ट्रॉल वाढते आणि वाईट कोलेस्ट्रॉल कमी होते.
वजन नियंत्रणात ठेवा
वाढलेले वजन हे उच्च कोलेस्ट्रॉलचे एक मोठे कारण आहे. नियमित व्यायाम आणि योग्य आहारामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहते, ज्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी नैसर्गिकरित्या कमी होते.
धूम्रपान आणि मद्यपान टाळा
धूम्रपान केल्याने रक्तवाहिन्या खराब होतात आणि चांगले कोलेस्ट्रॉल कमी होते. तसेच, जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने शरीरातील ट्रायग्लिसराइड्स वाढतात, जे हृदयासाठी हानिकारक आहे.
ताण कमी करा
सततचा ताण तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवू शकतो. योगा (Yoga), ध्यान किंवा कोणत्याही आवडीच्या कामात स्वतःला गुंतवून तुम्ही ताण कमी करू शकता. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)