Dagdusheth Ganpati: बाप्पाच्या आशीर्वादाने मोफत शिक्षण, UPSC ते फॅशन डिझाईन अनेक कोर्सेस, कुठे आणि कसा करायचा अर्ज?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
Dagdusheth Ganpati: श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर ट्रस्टकडून सर्वसामान्य नागरिकांसाठी शैक्षणिक व उपयुक्त असे विविध उपक्रम चालवले जात आहेत.
पुणे: जगप्रसिद्ध असलेली पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर ट्रस्ट हे राज्यभरातील भाविकांसाठी नेहमीच विविध उपयुक्त योजना राबवत असते. ट्रस्टच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून सर्वसामान्य नागरिकांसाठी शैक्षणिक व उपयुक्त असे विविध उपक्रम चालवले जात आहेत. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी तसेच होतकरूंसाठी विविध कोर्सेस सुरू करण्यात आले आहेत.
मंदिर ट्रस्टकडून सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटपासून ते आरी वर्कपर्यंत अनेक क्षेत्रातील कोर्सेस भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. आतापर्यंत महाराष्ट्रातील शेकडो नागरिकांनी या उपक्रमांचा लाभ घेतला आहे. सध्या दगडूशेठ गणपती ट्रस्टतर्फे अनेक कोर्सेस विनामूल्य राबवले जात असून, याविषयीची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी लोकल18 सोबत बोलताना दिली आहे.
advertisement
विनामूल्य कोर्सेस
पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर ट्रस्ट हे राज्यभरातील भाविकांसाठी विविध योजना राबवत असते. ट्रस्टतर्फे काही संस्थांच्या संयोगातून शैक्षणिक आणि रोजगाराभिमुख असे विविध कोर्सेसही चालवले जातात.ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी सांगितले की, गेल्या दोन-तीन वर्षांपासून अनेक शैक्षणिक कोर्सेस विनामूल्य राबवले जात आहेत.
आतापर्यंत सुमारे 850 विद्यार्थ्यांनी या उपक्रमांचा लाभ घेतला असून, अनेक विद्यार्थी सध्या प्रशिक्षण घेत आहेत. या उपक्रमामध्ये 17 कंपन्या आणि काही स्वयंसेवी संस्थांचा देखील सहभाग आहे.या कोर्सेसमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, आरी वर्क, ग्राफिक डिझायनिंग, डिजिटल मार्केटिंग, जिम ट्रेनर व न्यूट्रिशन, मोबाईल रिपेअरिंग, बिलिंग सॉफ्टवेअर, फॅशन डिझाईन, यूपीएससी अशा विविध क्षेत्रांतील कोर्ससचा समावेश आहे.
advertisement
या कोर्सेसचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात येऊन फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर भरलेला फॉर्म संबंधित प्रशिक्षण केंद्रात जमा करायचा आहे. या उपक्रमांमुळे शेकडो युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
September 18, 2025 1:37 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Dagdusheth Ganpati: बाप्पाच्या आशीर्वादाने मोफत शिक्षण, UPSC ते फॅशन डिझाईन अनेक कोर्सेस, कुठे आणि कसा करायचा अर्ज?