चाऊमीन स्टाईल मॅगीसाठी लागणारे साहित्य
- 3-4 मॅगी पॅकेट्स
- 1 मोठा ढोबळी मिरची (capsicum)
- 2 गाजर (carrots)
- 5-6 लसूण पाकळ्या
- एक चमचा जीरे
- एक कांदा
- हिरवी मिरची, एक टोमॅटो
- एक कप हिरवे वाटाणे (green peas)
- लाल मिरची पावडर, हळद पावडर, ओरिगॅनो (oregano), काळी मिरी (black pepper)
- चवीनुसार मीठ
- टोमॅटो सॉस, रेड चिली सॉस, सोया सॉस आणि व्हिनेगर
advertisement
चाऊमीन स्टाईल मॅगी बनवण्याची सोपी रेसिपी
1) मॅगी स्टीम करा
एका स्टीमरमध्ये (steamer) पाणी गरम करून मॅगी एका प्लेटमध्ये ठेवून शिजवा. तुम्हाला मसाल्याची चव आवडत असेल, तर मॅगी मसाला वरून घाला किंवा तसाच ठेवा. तसेच, ढोबळी मिरचीचे दोन ते तीन तुकडे कापून मॅगीसोबत शिजवा, जेणेकरून त्याचा सुगंध मॅगीमध्ये उतरेल.
2) मसाला आणि भाज्या तयार करा
पॅनमध्ये तेल गरम करून जीरे तडतडू द्या. बारीक चिरलेला लसूण घाला आणि लाल होईपर्यंत परता. लसूण भाजला जाईल, तेव्हा कांदा टाकून परता. त्यात हळद घाला.
3) भाज्या शिजवा
कांदा परतल्यानंतर, गाजर, ढोबळी मिरची आणि वाटाणे घालून शिजवा. त्यामध्ये मीठ घाला, जेणेकरून भाज्या चांगल्या शिजतील. जेव्हा भाज्या हलक्या शिजतील, तेव्हा चिरलेला टोमॅटो घाला आणि तो व्यवस्थित विरघळेपर्यंत शिजवा.
4) सॉस आणि मॅगी मिक्स करा
आता या भाज्यांमध्ये ओरिगॅनो घाला. तसेच, चव वाढवण्यासाठी रेड चिली सॉस, टोमॅटो सॉस, सोया सॉस आणि व्हिनेगर घाला. सगळे मिश्रण व्यवस्थित एकत्र करा आणि त्यात स्टीम केलेली मॅगी घाला. जर तुम्ही मॅगी मसाला वापरत असाल, तर तो आधीच मिक्स करा, जेणेकरून सर्व मसाल्याची चव संपूर्ण मॅगीत मिसळून जाईल आणि चव एकसारखी होईल. तुमची गरमागरम आणि स्पायसी चाऊमीन स्टाईल मॅगी तयार आहे!
हे ही वाचा : डोसा स्टाईलमध्ये बनवा पराठे! कणिक न मळता 5 मिनिटांत तयार करा 50 पराठे, 'ही' पाहा खास रेसिपी!
हे ही वाचा : Maggi Pakoda Recipe : कुरकुरीत मॅगी पकोडे बनवा घरीच, चवीला लागतील अतिशय टेस्टी, एकदम सोपी रेसिपी