Maggi Pakoda Recipe : कुरकुरीत मॅगी पकोडे बनवा घरीच, चवीला लागतील अतिशय टेस्टी, एकदम सोपी रेसिपी
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
अनेकदा आपली इच्छा पकोडे खाण्याची होते. तेव्हा आपण जास्तीत जास्त कांदा पकोडे, मिरची पकोडे बनवतो. पण, मॅगी वापरून सुद्धा पकोडे तयार होतात. मॅगी पासून बनवलेले पकोडे अगदी कुरकुरीत होतात.
अनेकदा आपली इच्छा पकोडे खाण्याची होते. तेव्हा आपण जास्तीत जास्त कांदा पकोडे, मिरची पकोडे बनवतो. पण, मॅगी वापरून सुद्धा पकोडे तयार होतात. मॅगी पासून बनवलेले पकोडे अगदी कुरकुरीत होतात. झटपट होणारी ही रेसिपी चवीला अतिशय टेस्टी लागते. घरगुती साहित्य वापरून तुम्ही ही रेसिपी अगदी सहज बनवू शकता. मॅगी पासून बनवलेले विविध पदार्थ तर तुम्ही खाऊन बघितले असतीलच, आता मॅगी पकोडे देखील ट्राय करा.
advertisement
advertisement
मॅगी पकोडे बनवण्याची कृती: एका भांड्यात पाणी घेऊन त्यात मॅगी मसाला आणि मॅगी टाकून अर्धवट शिजवून घ्यावेत. थंड झाल्यावर नूडल्स हलक्या हाताने मॅश करून बाजूला ठेवावेत. त्यानंतर त्यात बेसन, रवा, कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरे, ओवा, मीठ, हळद, कडीपत्ता टाकून घ्यायचा आहे. हे सर्व घटक चांगले एकजीव करून घ्या.
advertisement
advertisement
काही मिनिटांतच अगदी कुरकुरीत पकोडे तयार होतील. हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत गरमागरम मॅगी पकोडे सर्व्ह करू शकता. याठिकाणी दिलेलं साहित्याचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे. याप्रमाणे बनवलेले पकोडे अगदी कुरकुरीत होतात. हिरव्या चटणीसोबत अतिशय टेस्टी लागतात. चहा, कुरकुरीत पकोडे आणि चटणी हा बेत तुम्ही नक्की ठरवा.