TRENDING:

Summer Special Drink : बनवा थंडगार कैरीतलं ताक, कडक उन्हाळ्यात पोट राहील थंड! बनवणंही आहे अगदी सोपं

Last Updated:

Summer special kairich taak : आज आम्ही तुम्हाला अत्यंत चविष्ट बनवायला सोप्या अशा कैतल्या ताकाची रेसिपी सांगत आहोत. हे ताक उन्हाळयात तुम्हाला खूप फायदे देईल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : उन्हाळयात दुपारच्या जेवणासोबत काहीतरी थंड पिण्याची आपली इच्छा असते. मसाला ताक तर आपण नेहमीच पितो, कैरीची चटणी किंवा नुसती कैरीही खाल्ली जाते. पण या दोन्हीची मिळून आपण एक डिश बनवली तर.. आज आम्ही तुम्हाला अत्यंत चविष्ट बनवायला सोप्या अशा कैरीतल्या ताकाची रेसिपी सांगत आहोत. हे ताक उन्हाळयात तुम्हाला खूप फायदे देईल.
कैरीतलं ताक रेसिपी
कैरीतलं ताक रेसिपी
advertisement

कैरीतल्या ताकाची ही रेसिपी इन्स्टाग्रामवरील एका कोकणी पद्धतीचे पदार्थ दाखवणारे अकाऊंट aamhi_malvani_15 यांनी दिली आहे. हे ताक बनवायला तुम्हाला फार साहित्य लागणार नाही आणि अगदी झटपट बनेल. चला तर मग पाहूया कैरीतल्या ताकाची रेसिपी.

कैरीतलं ताक बनवण्यासाठी लागणारं साहित्य..

कैरी

दही

पाणी

जिरं

कोथिंबीर

हिरवी मिरची

मीठ

काळी मिरी

advertisement

बर्फाचे तुकडे

कैरीतलं ताक बनवण्याची सोपी पद्धत..

- कैरीतलं ताक बनवण्यासाठी आधी एका भांड्यामधे दही घ्या.

- या दह्यामध्ये पाणी घालून ते चांगलं घुसळून घ्या.

- व्यवस्थित घुसळल्यानंतर म्हणजेच मिक्स केल्यानंतर ताक तयार होईल.

- आता कैऱ्या स्वच्छ धुवून घ्या आणि त्याची साल काढा.

- कैरीच्या गुठळ्या काढून टाका आणि तिचे बारीक तुकडे कापून घ्या.

advertisement

- आता एका मिक्सरच्या भांड्यात कैरीचे तुकडे, काळी मिरी, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि जिरं टाकून याचा बारीक मिश्रण तयार करा.

- हे मिश्रण तयार ताकामध्ये टाका आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करा.

- शेवटी यामध्ये मीठ आणि हवी असल्यास कोथिंबीर टाकून एकत्र करा.

आता हे कैरीतलं ताक सर्व्ह करण्यासाठी तयार आहे. यासाठी काचेच्या एका ग्लासमध्ये बर्फाचे काही तुकडे टाका. त्यामध्ये हे कैरीचं ताक टाका. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये खरी बुंदी देखील टाकू शकता. त्यामुळे याला आणखी छान चव येईल. तर एकदा नक्की ट्राय करा.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सलाम! ‘ते’ दृश्य पाहिलं अन् कार घ्यायचा प्लॅन रद्द केला, थेट ॲम्ब्युलन्स घेतली, नववी पास महिलेचं मोठं काम, Video
सर्व पहा

Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Summer Special Drink : बनवा थंडगार कैरीतलं ताक, कडक उन्हाळ्यात पोट राहील थंड! बनवणंही आहे अगदी सोपं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल