TRENDING:

Surya Namaskar Day 2024 : दररोज घाला सूर्यनमस्कार, हृदयासह मनही राहील निरोगी, एकदा फायदे वाचाच

Last Updated:

दररोज सूर्य नमस्कार केल्याने शरीरासह मानसिक आरोग्य देखील चांगलं राहतं. तेव्हा सूर्य नमस्कार करण्याची योग्य वेळ कोणती? त्याने शरीराला कोणते फायदे मिळतात याविषयी सविस्तरपणे जाणून घेऊयात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
भारतात सूर्य नमस्कार दिवस 14 फेब्रुवारी रोजी साजरा केला जाणार आहे. सूर्यनमस्कार हा एक 12 आसनांचा ठरलेला चक्राकार क्रम आहे जे नियमित केल्याने आरोग्याला त्याचे अनेक फायदे मिळतात. दररोज सूर्य नमस्कार केल्याने शरीरासह मानसिक आरोग्य देखील चांगलं राहतं. तेव्हा सूर्य नमस्कार करण्याची योग्य वेळ कोणती? त्याने शरीराला कोणते फायदे मिळतात याविषयी सविस्तरपणे जाणून घेऊयात.
सूर्यनमस्कार
सूर्यनमस्कार
advertisement

सूर्यनमस्कार कधी करावा?

सकाळची वेळ ही सूर्यनमस्कार करण्यासाठी सर्वोत्तम मानली जाते. सकाळी सूर्यनमस्कार घालत्याने दिवसाची सुरुवात चांगली होते. दुपारी सूर्यनमस्कार केल्याने शरीराला त्वरित ऊर्जा मिळू शकते आणि संध्याकाळी सूर्यनमस्कार केल्याने दिवसभरातील थकवा दूर होऊन आराम मिळू शकतो. दररोज 10 ते 15 मिनटं सूर्यनमस्कार करणे पुरेसे ठरते. तसेच सूर्यनमस्कार हा अधिकतर रिकाम्या पोटी घालण्याचा प्रयत्न करा.

advertisement

वजन कमी करण्यास उपयुक्त : जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असेल तर नियमित सूर्यनमस्कार केल्याने फायदा मिळू शकतो. सूर्यनमस्कार केल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते आणि वजन नियंत्रणात राहते. सूर्यनमस्कार केल्याने शरीरातील कॅलरीज लवकर बर्न होतात आणि पचनक्रिया सुधारते.

Heart Attack : हार्ट अटॅक येण्यापूर्वी हातांवर दिसतात 3 लक्षणं, दुर्लक्ष करणं बेतेल जीवावर

advertisement

फुफ्फुसासाठी फायदेशीर : सूर्यनमस्कार घातल्याने हवा फुफ्फुसापर्यंत नीट पोहोचते, परिणामी रक्तामध्ये आॅक्सिजनचा पुरवठा वाढतो. सूर्यनमस्कार करताना श्वासोच्छवास योग्यरीत्या घ्यावा जेणेकरून फुफ्फुस निरोगी राहते आणि शरीरातील कार्बनडॉक्साईड आणि इतर विषारी वायू बाहेर पडण्यास मदत होते.

हृदय निरोगी राहते : सूर्यनमस्कार हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो यामुळे रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीत होते. अशाने हृदयाचे स्नायू मजबूत होतात आणि रक्त शुद्ध होते.

advertisement

पाठीचा मणका बळकट होतो : अनेकदा एकाच जागी बसून बसून पाठीचा मणका बेंड होतो आणि शरीराचे पोश्चर बिघडते. तेव्हा दररोज सूर्यनमस्कार घातल्याने पाठीचा मणका बळकट राहील आणि शरीराचं स्ट्रेचिंग देखील होईल.

मानसिक आरोग्य सुधारते : नियमित सूर्यनमस्कार केल्याने ताणतणाव दूर होतो आणि मनःशांती मिळते. सकाळच्यावेळी सूर्यनमस्कार केल्यास मानसिक आरोग्य सुधारण्यास अधिक फायदा मिळतो, तसेच स्मरणशक्ती देखील वाढते.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Surya Namaskar Day 2024 : दररोज घाला सूर्यनमस्कार, हृदयासह मनही राहील निरोगी, एकदा फायदे वाचाच
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल