Heart Attack : हार्ट अटॅक येण्यापूर्वी हातांवर दिसतात 3 लक्षणं, दुर्लक्ष करणं बेतेल जीवावर
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
हृदयाशी निगडित समस्या जाणवू लागल्यावर शरीर तुम्हाला विविध प्रकारचे संकेत देत असतं. काही लक्षण ही तुमच्या हातांवर देखील जाणवतात तेव्हा अशी लक्षण जाणवू लागल्यास वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधावा.
पौष्टिक आहाराचा अभाव, चुकीची जीवनशैली इत्यादींमुळे हार्ट अटॅकचा धोका सध्या वेगाने वाढत आहे. अनेकदा हार्ट अटॅकपूर्वी दिसणाऱ्या लक्षणांकडे लोक दुर्लक्ष करतात आणि हार्ट अटॅकला बळी पडतात. हृदयाशी निगडित समस्या जाणवू लागल्यावर शरीर तुम्हाला विविध प्रकारचे संकेत देत असतं. यातील काही लक्षण ही तुमच्या हातांवर देखील जाणवतात तेव्हा अशी लक्षण जाणवू लागल्यास वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधावा.
बोटांच्या टोकांना सूज येणे : हार्ट अटॅकच्या या लक्षणाला हिप्पोक्रेटिक बोट असं म्हणतात. यास्थितीत जेव्हा हातांची बोट एकमेकांवर आदळतात तेव्हा बोटांच्या टोकांना सूज येऊ लागते. हे हार्ट अटॅकचे लक्षण असू शकते. हृदयाला ऑक्सिजनचा पुरवठा नीट होत नसल्यावर अशी लक्षण रुग्णाला जाणवतात, तेव्हा अशी लक्षण जाणवल्यास तुम्ही तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा.
advertisement

डावा खांदा दुखणे : हार्ट अटॅक येण्याच्या काही वेळापूर्वी डाव्या खांदा दुखू लागतो. जर तुमचा डाव्या बाजूचा खांदा वारंवार दुखत असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधा. यामुळे वेळेवर उपचार होईल आणि तुमचा जीव वाचेल. हार्ट अटॅक येण्यापूर्वी अनेक वेळा शरीराच्या डाव्या बाजूला दुखणे सुरु होते. जे हळूहळू इतर अवयवांमध्ये पसरू लागते.
advertisement
हात सुन्न होणे : हार्ट अटॅक येण्यापूर्वी हात सुन्न होतात आणि अनेकदा त्यांना मुंग्या येतात. या लक्षणाकडे अजिबात दुर्लक्ष न करता डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या. वेळोवेळी तज्ज्ञ डॉक्टरांकडून हृदयाची तपासणी करणे फायद्याचे ठरेल.
अन्य लक्षणं : तुमच्या हृदयाच्या धमन्या ब्लॉक झाल्या असतील किंवा हार्ट अटॅक येणार असेल तर तुमच्या छातीत वेदना, घट्टपणा आणि दाब जाणवतो. हार्ट अटक येण्यापूर्वी खांद्याचा भाग खूप दुखू लागतो. तसेच डाव्या हाताने कोणतेही काम करताना अडचणी येतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 13, 2024 3:48 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Heart Attack : हार्ट अटॅक येण्यापूर्वी हातांवर दिसतात 3 लक्षणं, दुर्लक्ष करणं बेतेल जीवावर