Poisonous Fruits: लीची-काजू सारखी फळं खाताना टाळा 'या' चुका, नाहीतर पोटात गेल्यावर तयार होईल विष
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
आरोग्य चांगलं राहावं आणि शरीराला आवश्यक पोषकतत्व मिळावीत म्हणून अनेकजण फळं खाणं पसंत करतात. परंतु लिची, काजू सारखी काही फळं जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने खाल्लीत तर हे पदार्थ पोटात जाऊन विषाप्रमाणे कार्य करू शकतात. ओरेगॉन हेल्थ अँड साइंस यूनिवर्सिटीच्या काही शास्त्रज्ञांनी अशा फळ आणि भाज्यांची नाव सांगितली आहेत ज्यांचे सेवन करताना तुम्ही काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.
advertisement
advertisement
advertisement
चेरी, जर्दाळू, आलूबुखारा, पीच इत्यादी फळांच्या बीमध्ये एक असा पदार्थ आढळतो जो आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो. हा पदार्थ जर तुम्ही खाल्लात तर आजारी पडू शकता. यूरोपीय खाद्य सुरक्षा प्राधिकरणाच्या सांगण्यानुसार, जर हा पदार्थ केवळ 3.5 मिलीग्राम जरी तुमच्या पोटात गेला तर तो विषासमान आहे. त्यामुळे या फळांच्या बिया चुकूनही खाऊ नका.
advertisement
advertisement
advertisement
advertisement