घर आणि बाहेर अशा दोन्हीही जबाबदाऱ्या पार पाडताना स्वतःसाठी वेळ काढणं ही सोपी गोष्ट नाही, पण स्वत:साठी केवळ दहा-पंधरा मिनिटं द्या. इतक्या कमी वेळेत कुठेही न जाता, कुठल्याही साहित्याही गरज नसताना केला जाणार सूर्यनमस्कार हा सोपा आणि सहज व्यायाम आहे. दिवसाची सुरुवात या व्यायामानं केल्यानं खूप फायदे मिळू शकतात.
महिलांनी सूर्यनमस्कार का करावेत ते समजून घेऊया. सूर्यनमस्कार म्हणजे केवळ एक व्यायाम नाही तर शरीर आणि मन संतुलित करण्याचा एक सोपा आणि प्रभावी मार्ग आहे. महिलांना अनेकदा हार्मोनल असंतुलनाचा सामना करावा लागतो. कधीकधी मासिक पाळी अनियमित होते, कधीकधी मूड स्विंग्सचा त्रास होतो आणि कधीकधी त्यांना अकारण थकवा जाणवतो.
advertisement
Skin Care : रंगांमधल्या रसायनांचा त्वचेवर परिणाम, वेळेत घ्या डॉक्टरांचा सल्ला
मासिक पाळीच्या अनियमिततेमुळे किंवा पीसीओडीमुळे ग्रस्त असलेल्या महिलांसाठी देखील सूर्यनमस्कार फायदेशीर मानले जातात. सूर्यनमस्कार नियमित केल्यानं चयापचय सुधारतो आणि वजन नियंत्रित होण्यास मदत होते आणि मासिक पाळी संतुलित होण्यास देखील मदत होते.
सूर्यनमस्काराचा शरीराच्या अंतःस्रावी ग्रंथींवर, विशेषतः थायरॉईड आणि स्वादुपिंडावर सकारात्मक परिणाम होतो. त्याच्या विविध आसनांमधे, शरीराचं चांगलं स्ट्रेचिंग होतं, यामुळे अवयवांमधला रक्त प्रवाह सुधारतो. यामुळे हळूहळू हार्मोनल संतुलन होतं.
सूर्यनमस्कार केवळ शारीरिक आरोग्यासाठीच नाही तर मानसिक आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. आपण प्रत्येक आसन करताना श्वास घेण्यावर लक्ष केंद्रित करतो तेव्हा आपलं मन हळूहळू शांत होतं, ज्यामुळे ताण आणि चिंता कमी होते. अनेक महिलांना निद्रानाशाचा त्रास होतो. दररोज सूर्यनमस्कार केल्यानं शरीराचा थकवा दूर होतो आणि मनाला आराम मिळतो, ज्यामुळे रात्री चांगली झोप येते.
Hydration : पाणी प्या, शरीराला लागेल तितकं पाणी पिताय का ? दुर्लक्ष करु नका
याव्यतिरिक्त, सूर्यनमस्कार देखील शरीराची स्थिती सुधारण्यास मदत करतात. जास्त वेळ बसल्यामुळे पाठ आणि मान दुखते. नियमित सरावामुळे शरीराची लवचिकता सुधारते, स्नायू मजबूत होतात. योग्य आसनामुळे आपलं व्यक्तिमत्व चांगलं दिसतं, त्यामुळे आत्मविश्वास देखील वाढतो.
सर्वात चांगली गोष्ट म्हणजे सूर्यनमस्कारासाठी कोणत्याही विशेष उपकरणांची किंवा मोठ्या जागेची आवश्यकता नसते. यासाठी एक योगा मॅट आणि सातत्य हवं. सूर्यनमस्कारांची संख्या एकदम वाढवण्याऐवजी जशी जमेल तशी संख्या वाढवा. सकाळी रिकाम्या पोटी सूर्यनमस्कार करणं अधिक फायदेशीर मानलं जातं पण जर तुमच्याकडे सकाळी वेळ नसेल तर तुम्ही ते संध्याकाळी देखील करू शकता. यासाठी योग्य प्रशिक्षकाकडून प्रशिक्षण घ्या, यासंदर्भातले अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरही उपलब्ध आहेत.
