TRENDING:

Body Pain : कोणतंही कारण नसताना अंग का दुखतं ? मानसिक ताणामुळे अंग दुखू शकतं का ? यावर कोणते उपाय करायचे ?

Last Updated:

आजची जीवनशैली, ज्यात दीर्घकाळ बसून काम करणं, झोपेची कमतरता, ताण आणि असंतुलित आहार यांचा समावेश आहे, यामुळे शरीरात हळूहळू थोडी सूज येऊ शकते. ही सूज आल्यानं, स्नायू दुखणं आणि सांधे दुखणं किंवा थकवा येतो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : जास्त श्रम झाले असतील किंवा जास्त व्यायाम झाला असेल तर अंग भरुन येतं. पण काही वेळा कोणतंही कारण नसताना सकाळी उठल्यावर अनेकांचं अंग दुखतं. काहींचे खांदे दुखतात, पाठ भरल्यासारखी वाटते किंवा पाय जड होतात.
News18
News18
advertisement

कोणतीही दुखापत किंवा श्रम नसतील, तरीही शरीर थकलेलं आणि दुखत असल्याचं जाणवतं. दररोज शरीर दुखण्याचं प्रमाण वाढत चाललंय. डॉक्टरांच्या मते, ही वेदना नेहमीच स्नायूंच्या ताणामुळे होत नाही. कधीकधी, ती शरीरात सुरू असलेल्या इतर प्रक्रियांचंही लक्षण असू शकतं.

आजची जीवनशैली, ज्यात बराच वेळ बसून काम करणं, झोपेची कमतरता, ताण आणि असंतुलित आहार यांचा समावेश आहे, यामुळे शरीरात हळूहळू थोडी सूज येऊ शकते. ही सूज आल्यानं, स्नायू दुखणं आणि सांधे दुखणं किंवा थकवा येतो.

advertisement

Summer Care : उन्हाळ्यात जेवणासोबत कांदा का खातात ? जाणून घेऊया कारणं

दीर्घकाळापर्यंतच्या ताणाचाही शरीरावर खोलवर परिणाम होतो. एखादी व्यक्ती सतत तणावात असते तेव्हा कॉर्टिसोल आणि ॲड्रेनालाईनसारखे हार्मोन्स जास्त प्रमाणात तयार होतात. सुरुवातीला, हे हार्मोन्स शरीराला आव्हानांना तोंड देण्यास मदत करतात, परंतु जेव्हा ताण बराच काळ टिकतो तेव्हा शरीराच्या नसा आणि स्नायू सतत तणावाच्या स्थितीत राहतात. यामुळे मान, खांदे आणि पाठ जड होणे किंवा वेदना होऊ शकतात.

advertisement

झोपेचा अभाव हे देखील शरीराच्या वेदनांचं एक प्रमुख कारण असू शकतं. गाढ झोपेच्या वेळी शरीर स्वतःची दुरुस्ती करतं, ऊर्जा राखून ठेवतं आणि स्नायूंना आराम देतं. झोप अपूर्ण असेल किंवा वारंवार व्यत्यय आला तर ही प्रक्रिया अपूर्ण राहते. म्हणूनच अनेकांना जास्त हालचाल न करताही थकल्यासारखं वाटतं किंवा त्यांना वेदना जाणवतात.

Bloating : ब्लोटिंग कमी कसं करायचं ? शरीरात काय होतं ?

advertisement

आहाराचा शरीराच्या वेदनांशीही जवळचा संबंध आहे. प्रक्रिया केलेलं अन्न म्हणजेच प्रोसेस्ड फूड आणि अति चरबीयुक्त पदार्थ खाल्ल्यानं शरीराची सूज वाढू शकते. पण, फळं, भाज्या आणि ओमेगा-3 असलेल्या पदार्थांमुळे सूज कमी करण्यास मदत होते.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कडाक्याच्या उन्हात वाघोबाचा थाट, सिद्धार्थ उद्यानात बसविण्यात आली खास कूलिंग व्यवस्था, Video
सर्व पहा

अशा दैनंदिन वेदना अनेकदा जीवनशैलीतल्या साध्या सवयींनी कमी करता येतात. नियमित हलका व्यायाम, स्ट्रेचिंग, पुरेशी झोप, संतुलित आहार आणि तणाव व्यवस्थापन व्यवस्थित असेल तर शरीर  निरोगी राखण्यास मदत होते. पण वेदना अनेक आठवडे चालू राहिल्या तर तज्ज्ञांचा सल्ला घेणं चांगलं.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Body Pain : कोणतंही कारण नसताना अंग का दुखतं ? मानसिक ताणामुळे अंग दुखू शकतं का ? यावर कोणते उपाय करायचे ?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल