TRENDING:

Food Tips : उन्हाळ्यासाठी खास चटणी, कैरी - कांद्याच्या चवीनं येईल जिभेला चव, जेवणाची वाढेल रंगत

Last Updated:

उन्हाळ्यात, अनेकदा काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा होते. त्यासाठी कैरी कांद्याची चटणी असेल तर दोन घास जास्त जातील. कैरीची ताजी आणि आंबट चव आणि कच्च्या कांद्याचा सौम्य तिखटपणा आणि गुळ या सगळ्याची चव खूप मस्त लागते. कच्चा कांदा आणि पुदिन्यामुळे थंडावा मिळतो आणि उन्हाळ्यात उष्णतेपासून आपलं संरक्षण होतं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : उन्हाळा म्हटलं की कैरी आलीच. कैरीचं पन्हं, कैरीची चटणी, कैरीचं लोणचं अशा सगळ्याची तयारी घराघरात सुरु असते. आंबट गोड कैरीची आणि कांद्याची चटणी हादेखील एक मस्त पर्याय आहे.
News18
News18
advertisement

उन्हाळ्यात, अनेकदा काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा होते. त्यासाठी कैरी कांद्याची चटणी असेल तर दोन घास जास्त जातील. कैरीची ताजी आणि आंबट चव आणि कच्च्या कांद्याचा सौम्य तिखटपणा आणि गुळ या सगळ्याची चव खूप मस्त लागते. कच्चा कांदा आणि पुदिन्यामुळे थंडावा मिळतो आणि उन्हाळ्यात उष्णतेपासून आपलं संरक्षण होतं.

Health Tip : आरोग्यम् धन संपदा, आरोग्य दिनानिमित्त जाणून घ्या व्यायाम, आहाराचं महत्त्व, दहा मिनिटांचं वेळापत्रक ठेवेल प्रकृती उत्तम

advertisement

एक मध्यम आकाराची कैरी साल काढून बारीक चिरुन घ्या. एक मोठा कांदा बारीक चिरुन घ्या. दोन ते तीन हिरव्या मिरच्या, गूळ किंवा साखर: दोन-तीन मोठे चमचे, ताजी पुदिन्याची पानं अर्धी वाटी, भाजलेल्या जिऱ्याची पूड अर्धा छोटा चमचा. चवीनुसार काळं मीठ आणि साधं मीठ असं साहित्य चटणीसाठी लागेल.

प्रथम, कैरी आणि कांदा स्वच्छ धुवून त्यांची साल काढा आणि लहान तुकडे करा. पुदिन्याची पानं स्वच्छ पाण्यानं धुवा. कापलेली कैरी, कांदा, हिरव्या मिरच्या आणि पुदिन्याची पानं मिक्सरच्या जारमधे एकत्र करा. गोडव्यासाठी त्याच जारमधे गूळ किंवा साखर, भाजलेल्या जिऱ्याची पूड, काळं मीठ आणि थोडं साधं मीठ घाला.

advertisement

Summer Care : ऐन उन्हाळ्यात शरीर डिटॉक्स करण्यासाठी उपयुक्त आयुर्वेदिक उपाय, उन्हात राहिल शरीर हलकं, आजार पळतील दूर

हे सर्व साहित्य पाणी न घालता वाटून घ्या. या चटणीची अगदी बारीक पेस्ट बनवू नका. थोडी जाडसर ठेवल्यानं, कांदा आणि कैरीचा कुरकुरीतपणा जाणवेल.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
बाबासाहेबांनी वापरलेले टेबल ते भांडी, पुण्यातील ऐतिहासिक संग्रहालयात जिवंत ठेवा, तुम्ही पाहिला का? Video
सर्व पहा

तिखट, गोड-आंबट चटणी काही मिनिटांत तयार होते. हवाबंद काचेच्या बरणीत फ्रिजमधे तीन-चार दिवसांसाठी साठवून ठेवू शकता.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Food Tips : उन्हाळ्यासाठी खास चटणी, कैरी - कांद्याच्या चवीनं येईल जिभेला चव, जेवणाची वाढेल रंगत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल