अमेरिकेतील पॅरेंटिंग तज्ज्ञ लॉरा मार्कहम यांच्या मते, ही 9 मिनिटे मुलांच्या दिवसाच्या तीन मुख्य वेळी येतात. सकाळी उठल्या उठल्याची 3 मिनिटे, शाळेतून घरी परतल्यावरची 3 मिनिटे आणि रात्री झोपण्यापूर्वीची 3 मिनिटे. या तिन्ही वेळी मुलांचा मेंदू सर्वात जास्त भावनिक असतो आणि ते पालकांच्या वागणुकीला लगेच टिपतात.
मुलांसाठी अत्यंत आवश्यक आहेत 'हे' 3-3-3 म्हणजेच 9 मिनिटे
advertisement
1. सकाळी उठल्या उठल्याची तुमची वागणूक : बहुतेक मुलांची सकाळ घाईगडबडीत आणि ओरडा-ओरडीत जाते. “लवकर उठ”, “उशीर होतोय”, “चल, ब्रश कर” अशी सुरुवात मुलांमध्ये आतल्या आत तणाव निर्माण करू शकते. जर तुम्ही सकाळी उठल्यावर मुलाला हलके मिठी मारली, हसून “गुड मॉर्निंग” म्हटले आणि फक्त २ मिनिटे त्याच्यासोबत बसलात, तर त्यांचा दिवस सकारात्मक सुरू होतो. तज्ज्ञ म्हणतात की, यामुळे मुलांना सुरक्षित वाटते, मूड स्थिर राहतो आणि अभ्यासात एकाग्रता वाढते.
2. शाळेतून परतल्यावरची 3 मिनिटे : जेव्हा मूल शाळेतून घरी येते, तेव्हा त्याच्या मनात अनेक गोष्टी चालू असतात. कदाचित कोणाशी भांडण झाले असेल, एखादा पेपर खराब झाला असेल किंवा ते फक्त थकून गेले असेल. अशा वेळी जर पालक फोनमध्ये व्यस्त राहिले किंवा फक्त “जा, कपडे बदल” असे म्हणाले, तर मूल भावनिकदृष्ट्या दूर होऊ लागते. शाळेतून येताच फक्त 3 मिनिटे मुलांना जवळ घेणे, एक गोड स्मितहास्य, छोटीशी मिठी आणि “आजचा दिवस कसा होता?” असे 1-2 प्रश्न मूलांना तुमच्याशी आणखी जोडतात. ही 3 मिनिटे त्याचा आत्मविश्वास आणि बोलण्याची क्षमता खूप मजबूत करतात.
3. झोपण्यापूर्वीची वेळ : रात्रीची वेळ मुलांसाठी खूप संवेदनशील असv. जर या वेळी ओरडा, राग किंवा अंतर दाखवले, तर मुलाची झोप बिघडू शकते आणि त्याचा मेंदू चिंतेने भरू शकतो. झोपण्यापूर्वी फक्त 3 मिनिटे शांत वातावरणात घालवा. उदाहरणार्थ, एखादी मजेशीर गोष्ट सांगणे, दिवसाबद्दल बोलणे, मुलांना प्रेमाने मिठी मारणे किंवा डोक्यावरून हात फिरवणे. हे छोटे क्षण मुलांमध्ये सुरक्षितता, विश्वास आणि सकारात्मक विचार भरतात. यामुळे मूल अधिक शांत, आनंदी आणि भावनिकदृष्ट्या मजबूत बनते.
ही 9 मिनिटे का आवश्यक आहेत?
- मुले या वेळी पालकांच्या भावना सर्वात जास्त चांगल्या प्रकारे समजून घेतात.
- ही 9 मिनिटे मुलांच्या अवचेतन मनात साठवली जातात.
- यामुळे मूल अधिक सुरक्षित, आत्मविश्वासी आणि आनंदी राहते.
- मुलांमधील चिडचिडेपणा आणि वर्तन समस्या कमी होतात.
- पालक आणि मुलांच्या भावनिक नात्याचा पाया मजबूत होतो.
पालकांनी या टिप्स कशा वापराव्यात?
- सकाळी उठल्याबरोबर फोनपासून दूर राहा आणि मुलांकडे पूर्ण लक्ष द्या.
- शाळेतून परतल्यावर कोणत्याही कामाआधी मुलांना एक स्मितहास्य आणि एक मिठी द्या.
- रात्री झोपण्यापूर्वी टीव्ही किंवा मोबाईल बंद करून मुलासोबत 3 मिनिटे बसा.
- मुलांच्या बोलण्यात व्यत्यय आणू नका, त्यांना पूर्ण बोलू द्या.
- रोज या 9 मिनिटांना नित्यक्रमाचा भाग बनवण्याचा प्रयत्न करा, यामुळे दीर्घकाळात खूप मोठा फरक पडतो.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
