पाटणा, 15 डिसेंबर : आजकाल भात-भाकरी नको पण पिझ्झा-बर्गर हवा, अशी सर्व वयोगटातील खवय्यांची परिस्थिती आहे. परिणामी आजारांचं प्रमाण प्रचंड वाढलंय. परंतु चवीला एकदम भारी असणाऱ्या आणि पुन्हा पुन्हा खावासा वाटणाऱ्या पिझ्झाचा समावेश फास्ट फूडमध्ये होतो. फास्टफूड अतिप्रमाणात खाल्ल्यास फॅट वाढतात, पोट बिघडतं हे काही नव्यानं सांगायला नको. परंतु एका ठिकाणी चक्क आरोग्यदायी पिझ्झा मिळतो. होय! हा पिझ्झा खाल्ल्यामुळे शरिराचं काहीही नुकसान होत नाही, तर फायदाच होतो. त्यामुळे विविध आजारांशी लढण्याची ताकद शरिराला मिळते.
advertisement
बिहारमध्ये हा पिझ्झा मिळतो. पाटण्याचे डॉक्टर पवन प्रकाश सांगतात की, विविध आजारांवर उपाय म्हणून हा पिझ्झा खाल्ला जातो. कारण तो साधासुधा नाही तर मखानाचा पिझ्झा असतो. विशेषत: पुरुषांसाठी तो रामबाण ठरतो. कारण पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी मखाना उपयुक्त असतो.
थंडीत वाटत नाही घराबाहेर पडावसं; डायटमध्ये करा 'या' पदार्थांचा समावेश, राहाल तंदुरुस्त!
डॉक्टर सांगतात की, मखानामुळे पुरुषांमध्ये टेस्टेस्टेरॉन हार्मोन (Testosterone Hormone) वाढतात. त्यामुळे शुक्राणूंची संख्या वाढण्यास मदत मिळते. म्हणूनच आपल्या डाएटमध्ये आपण मखाना पिझ्झाचा समावेश करू शकता.
थंडीत खा 'हे' 5 पदार्थ, शरीर राहील उबदार; आजारांपासून होईल संरक्षण
घरीही बनवू शकता
सर्वात आधी मखाना तूपात तळून घ्या. जोपर्यंत मखाना मऊ होत नाही, तोपर्यंत तळा. मऊ झाल्यावर मिक्सरमध्ये मखान्याची पेस्ट करून घ्या. त्यांनंतर कोमट पाण्यात थोडंसं मीठ घालून ही पेस्ट व्यवस्थित मळा. दुसऱ्या दिवशी मखानाच्या पेस्टचा पिझ्झा बेस बनवा. मग तवा गरम करून त्यावर तेल घाला. त्यावर पिझ्झाचा बेस शेकवून घ्या. थोड्यावेळाने त्यावर हव्या त्या भाज्या घाला. ओरेगॅनो, पिझ्झा सॉस असे हवे ते पदार्थ आपण अॅड करू शकता.
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा https://whatsapp.com/channel/0029Va7W4sJI7BeETxLN6L0g