TRENDING:

किचनमधला लहानसा पदार्थ, अनेक आजार करतो नष्ट! पचन आणि मधुमेहावर लय भारी!

Last Updated:

एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत देशभरात सगळीकडे फोडणीत या पदार्थाचा वापर होतो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मनीष पुरी, प्रतिनिधी
हिवाळ्यात या पदार्थाचं सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.
हिवाळ्यात या पदार्थाचं सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.
advertisement

भरतपूर : एखाद्या पदार्थात कमी पडली तर पदार्थ बेचव होतो, जास्त पडली तर पदार्थात कडवटपणा येतो, अशी ही चिमूटभर हळद म्हणजे किचनमधला अतिमहत्त्वाचा पदार्थ. शिवाय विविध आजारांवरही हळद रामबाण असते. कुठे जरा खरचटलं जरी तरी आपण तिथे लगेच हळद लावतो. शिवाय हळदीचं सेवन आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतं. म्हणूनच एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत देशभरात सगळीकडे फोडणीत हळदीचा वापर होतो.

advertisement

आयुर्वेदिक डॉक्टर चंद्र प्रकाश दीक्षित यांनी हळदीचे फायदे सविस्तरपणे सांगितले आहेत. जखमेवर हळद लावल्यास रक्तस्त्राव ताबडतोब थांबतो आणि जखमही लवकर भरते, असं डॉक्टर सांगतात. शिवाय हळदीत अँटीसेप्टिक आणि अँटीबायोटिक गुणधर्म असल्यामुळे त्या जागचं दुखणंही लवकर थांबतं. अंगदुखी बरी होत असल्याने विशेषतः हिवाळ्यात हळदीचं सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. कारण हिवाळ्यात हात-पाय आखडतात. त्यामुळे आपण हळद घातलेलं गरम दूध पिऊ शकता.

advertisement

'हे' फळ म्हणजे अँटीऑक्सिडंटचं पॉव्हर हाऊस, रक्त वाढवतं आणि पोटही निरोगी ठेवतं

हळदीमुळे हाडं होतात मजबूत

हळदीत असलेल्या पोषक तत्त्वांमुळे रक्तातले विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत मिळते. त्यामुळे रक्ताभिसरणही उत्तम होतं. शिवाय रक्त पातळ राहतं आणि धमन्यांमधला रक्तप्रवाह वाढतो. तसंच हृदयासंबंधित आजारांवरही हळद गुणकारी ठरते. हळदीचं दूध पायल्यास हाडं मजबूत होतात. कारण हळदीमुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते आणि दुधातून कॅल्शियम मिळतं.

advertisement

अंधश्रद्धेतून वाढतोय गंभीर मानसिक आजार, जाणून घ्या लक्षणं आणि करा संरक्षण

स्तनांच्या कर्करोगात फायदेशीर

हळदीत करक्यूमिन तत्त्व असतात. ज्यामुळे कर्करोगाच्या पेशी रोखण्यास मदत मिळते. विशेषतः स्तनांच्या कर्करोगावर ती रामबाण असते. लक्षात घ्या, हळदीमुळे कर्करोगाचा धोका कमी होतो, मात्र हळद हा कर्करोगावरील उपाय नाही.

लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा https://whatsapp.com/channel/0029Va7W4sJI7BeETxLN6L0g

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
किचनमधला लहानसा पदार्थ, अनेक आजार करतो नष्ट! पचन आणि मधुमेहावर लय भारी!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल