हझारीबाग, 29 नोव्हेंबर : काही दिवसांपूर्वी गुलाबी थंडीला सुरुवात झाली, त्यात पाऊस पडला मग काही विचारायलाच नको. वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झालाय. या गारव्यासोबतच आले आहेत हिवाळी आजार. त्यामुळे या आजारांपासून संरक्षण करण्यासाठी आपण स्वत:ची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे.
हिवाळ्यात गरम कपडे घालावे, त्वचा रखरखीत होऊ नये म्हणून मॉइश्चरायझर लावावं. शिवाय थंडीत शरिराला उपयुक्त असे पदार्थ खावे. डिंकाचा लाडू हा त्यापैकीच एक. यामध्ये वापरले जाणारे पदार्थ गरम असतात. जे थंडीत शरिराला उब देतात.
advertisement
शेपूच्या भाजीपासून बनवा चविष्ट वडी; बनवण्याची सोपी पद्धत पाहा
झारखंडच्या हझारीबागेत मधुलिका स्वीट्स हे दुकान अत्यंत प्रसिद्ध आहे. या दुकानाचे मालक कृष्णकांत सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, हझारीबागेतील गांधी मैदानात मागील 22 वर्षांपासून हे दुकान सुरू आहे. तेव्हापासून याठिकाणी डिंकाचे लाडू विकले जातात. थंडी पडायला सुरुवात होताच डिंकाच्या लाडूंना मोठी मागणी मिळते. शिवाय आळशीचे लाडू खरेदी करायलाही दूरदूरहून लोक याठिकाणी येतात.
सुकामेवा नाही, जेवणच देतं पोषक तत्त्व; डोंगराळ भागात थंडीत 'असं' होतं संरक्षण
इथल्या डिंक आणि आळशीच्या लाडूंमध्ये भरपूर ड्रायफ्रूट्सचा समावेश असतो. शिवाय यात गरम पदार्थ वापरले जातात आणि दोन्ही लाडू शुगर फ्री असतात. त्यामुळे ते मधुमेहाचा त्रास असणाऱ्या व्यक्तीही बिनधास्त खाऊ शकतात. 15 रुपयांना 1 आणि 600 रुपयांना किलो अशी या लाडूंची किंमत आहे.
डिंकाचे लाडू बनवण्यासाठी सर्वात आधी एका कढईत तूप गरम करावं. त्यात डिंक घालून मध्यम आचेवर फ्राय करून घ्यावं. डिंकाचा रंग गोल्डन ब्राऊन होताच काही वेळ मिश्रण थंड होऊ द्यावं. त्यानंतर ते मिक्सरमध्ये वाटून घ्यावं. पुढे त्याच कढईत आपल्याला हवं ते पीठ गरम करावं. पिठाचा रंग हलका गोल्डन होऊ लागला की त्यात वाटलेलं डिंक आणि ड्रायफ्रूट घालून गॅस बंद करावी. आता त्यात चवीनुसार साखर किंवा गूळ घालून छान गोलाकार लाडू वळून घ्यावे. दरम्यान, मधुलिका स्वीट्समध्ये मिळणारे डिंकाचे लाडू शुगर फ्री असतात.
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा https://whatsapp.com/channel/0029Va7W4sJI7BeETxLN6L0g