शेपूच्या भाजीपासून बनवा चविष्ट वडी; बनवण्याची सोपी पद्धत पाहा
- Published by:News18 Marathi
Last Updated:
शेपूची भाजी काही लोकांना अजिबात आवडत नाही. शेपूच्या भाजीच्या वड्या बनवून तुम्ही आवडीने खाऊ शकाल.
हिवाळ्याचा हंगाम सुरू झालाय आणि बाजारात शेपूची भाजी सहज रित्या उपलब्ध आहे. ही भाजी काही लोकांना अजिबात आवडत नाही. मात्र शेपूच्या भाजीच्या वड्या बनवून तुम्ही आवडीने खाऊ शकाल. अगदी सोप्या पद्धतीने चविष्ट अशी शेपूच्या भाजीची वडी कशी बनवावी? याची रेसिपी वर्धा येथील गृहिणी भाग्यश्री आकाशे यांनी सांगितली आहे.
advertisement
advertisement
कशी बनवायीच शेपूची वडी? सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात शेपूची बारीक चिरून घेतलेली भाजी घ्या. त्यात तांदळाचे पीठ, बेसन, हिरव्या मिरचीची पेस्ट, आले-लसूणची पेस्ट, तीळ, ओवा, चवीनुसार हळद, मीठ, धने, जिरेपूड हे एकत्र करून भिजवून गोळा बनवून घ्यायचा आहे. गरज असल्यास आणखी बेसन किंवा गरज वाटल्यास पाणीही अॅड करू शकता.
advertisement
गोळा भिजवून झाल्यानंतर दोन समान भागात लांबुळके गोळे बनवून दोन्ही साईडला चपटे करून घेऊन कढईत पाण्यावर चाळणी ठेवून वाफवून घ्यायचे आहे. जेणेकरून वडी पाडण्यास सोपे जाईल. हे गोळे 15 मिनिटे वाफवून घेतल्यानंतर चाकूला तेल लावून वडी पाडून घ्यायच्या आहेत. त्यानंतर तव्यावर तेल घालून शालो फ्राय करून घ्यायचे आहे. आता शेपूच्या भाजीच्या चविष्ट वड्या खाण्यासाठी तयार आहेत.
advertisement
आपण मेथी, पालक, कोथिंबीरीची वडी ट्राय करून पाहिली असेल. या वड्या चवीला भन्नाट लागतात, पण आपण शेपूची वडी जर करून बघितली नसेल तर नक्कीच ट्राय करून बघा. जर घरात शेपूची जुडी असेल तर, त्याची भाजी न करता वडी ट्राय करायला हरकत नाही. शेपूची वडी करण्यासाठी जास्त साहित्य किंवा जास्त मेहनत घ्यावी लागत नाही. ही रेसिपी झटपट तयार होते.