बाजरीच्या भाकरीचे फायदे
बाजरी हे उष्ण प्रकृतीचं धान्य आहे. हिवाळ्यात बाजरी खाल्ल्याने शरीर आतून उबदार राहायला मदत होते. शिवाय बाजरीची भाकरी ही पोषणतत्वांनी परिपूर्ण आहे. बाजरीच्या भाकरीत प्रथिनं, फायबर आणि खनिजं भरपूर प्रमाणात याशिवाय बाजरीची भाकरी ही ‘ग्लूटेन फ्री’ आहे. त्यामुळे ती खाल्ल्याने वजन किंवा फॅटस् वाढत नाहीत. थंडीच्या मोसमात मोहरीची भाजी जी ‘सरसोका साग’ नावाने सुप्रसिद्ध आहे अशा मोहरीच्या किंवा हिरव्या पालेभाज्यांसोबत बाजरीची भाकरी चवीने खाल्ली जाते. बाजरी ही योग्य पदार्थासोबत खाल्ली तर तिच्या फायद्यांमध्ये नक्कीच वाढ होईल. मात्र चुकीच्या पदार्थांसोबत बाजरी खाल्ली तर आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.
advertisement
हे सुद्धा वाचा : आरोग्यासाठी एकदम योग्य, हिवाळ्यात करा बाजरी मेथी पराठा, संपूर्ण रेसिपी VIDEO
चला तर मग जाणून घेऊया बाजरीच्या रोटीसोबत किंवा भाकरी सोबत काय खावं आणि काय टाळावं ते.
बाजरीच्या भाकरी सोबत काय खाऊ नये?
मांसाहार:
ज्वारीप्रमाणे बाजरीच्या भाकरीसोबत तुम्ही मटनावर ताव मारण्याचा बेत करत असाल तर तो आत्ताच थांबावा. किंबहुना कोणत्याही प्रकाराचा मांसाहार करता बाजरी खाणं टाळा. बाजरी आणि मांसाहार हे स्वभावाने उष्ण आहेत. त्यामुळे एकाच वेळी उष्ण प्रकृतीच्या गोष्टी खाल्ल्याने शरीरात प्रचंड उष्णता निर्माण होऊन, जळजळ, ॲसिडिटी किंवा गॅसेसचा त्रास होऊ शकतो. यामुळे पचनाच्या समस्या उद्भवू शकतात.
शाकाहार:
असं नाहीये की, फक्त मांसाहार करताना बाजरी खाणं हे धोक्याचं आहे. असे अनेक शाकाहारी पदार्थ आहेत ते उष्ण प्रकृतीचे असल्यामुळे त्याबरोबर बाजरी खाणं हे धोक्याचं ठरू शकतं. छोले, काबूली चणे किंवा हरभऱ्याची भाजी बाजरीच्या भाकरीसोबत खाणं टाळावं. कारण या भाज्या तयार करताना मसाल्यांचा जास्त वापर होतो. त्यामुळे उष्णता निर्माण होऊन ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो. दीर्घकाळ तुम्ही जर असं अन्न खात असाल तर बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो.
हे सुद्धा वाचा: हिवाळ्यात आरोग्यासाठी फायदेशीर बाजरीची खिचडी, तुम्हाला माहितीये का रेसिपी?
जंक फूड किंवा तेलकट पदार्थ:
अनेकांना वडा, समोस्या सोबत भाकरी किंवा चपाची खाण्याची सवय असते. मात्र बाजरीच्या भाकरीसोबत भजी, समोसा किंवा जास्त तळलेले खाणं टाळा. बाजरीच्या भाकरीत भरपूर फायबर्स असतात. खरं तर ते अन्न पचायला मदत करतात. मात्र फायबर्स आणि तेलकट पदार्थ एकाचवेळी खाल्ल्यास पचनक्रियेत येते. त्यामुळे अपचानाचा त्रास होऊन गॅसेस, पोटफुगी किंवा पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. याशिवाय ज्यांना अल्सर, ॲसिडिटी आणि त्वचेशी संबंधित समस्या आहेत त्यांनी बाजरीच्या भाकरीचे सेवन करू नये.