Kitchen Tips : भाकरी काही वेळाने कडक होते, मऊ राहण्यासाठी वाचा भन्नाट टिप्स, कारभारी होतील खुश
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
अनेक घरांमध्ये पोळी आणि भाकरी हे पदार्थ बनवले जातात. त्यातही जर जेवणाच्या ताटात भाकरी असेल तर बऱ्याच जणांच्या पोटात दोन घास एक्स्ट्राच जातात. परंतु बऱ्याचदा भाकरी बनवून काही झाला की ती कडक होते. तेव्हा भाकरी जास्त वेळ मऊ लुसलुशीत राहण्यासाठी काही टिप्स फॉलो करा.
advertisement
भाकरी तुटू नये किंवा पोळीप्रमाणे एकसारखी व्हावी म्हणून पीठ कोमट पाण्यात भिजवावे. गव्हामध्ये ग्लुटेनचे प्रमाण जास्त असल्याने गव्हाची कणीक चिकट असते. मात्र ज्वारी, बाजरी आणि इतर धान्यांतही ग्लुटेनचे प्रमाण कमी असल्याने ते पीठ जास्त कोरडे असते. पण कोमट पाण्याचा वापर केल्यास पीठ एकसंध व्हायला मदत होते आणि भाकरी चांगली थापली जाते.
advertisement
advertisement
advertisement


