मनुका
TOI मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका बातमीनुसार, पावसाळ्यात मनुका खाल्ल्यास तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढेल. मनुका खाल्ल्यानं पावसाळा या ऋतूत होणाऱ्या किरकोळ आजार आणि संसर्गापासूनही संरक्षण मिळेल, कारण त्यात भरपूर व्हिटॅमिन सी, के, कॉपर, फायबर, पोटॅशियम असतं. तसंच मनुकांमुळे बद्धकोष्ठतेपासूनही आराम मिळतो.
advertisement
'या' 7 पदार्थांमध्ये दडलंय तुमच्या चेहऱ्याचं सौंदर्य; तारुण्य राहील टिकून, गालांवर येईल चमक
जांभूळ
या काळात भरपूर प्रमाणात जांभूळ उपलब्ध असतं. जांभूळ खाणं मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर असतं, कारण ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवतं. जांभळामध्ये कॅल्शियम असतं, जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी फायदेशीर असतं. त्यामुळे पोटाचं आरोग्यही चांगले राहतं. पावसाळ्यात बहुतेकांना पोटाशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो. जर तुम्हाला उलट्या, मळमळ, पोटदुखी आणि संसर्गापासून सुरक्षित राहायचे असेल तर तुम्ही जांभूळ खाऊ शकता. रक्ताभिसरण, यकृत आणि किडनीच्या कार्यातही हे फळ फायदेशीर आहे. यामध्ये व्हिटॅमिन सी आणि फायबरसोबत लोह असतं, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवतं.
पावसाळ्यात 'लिची' हे फळही मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतं. त्यात भरपूर पाणी असतं. लिचीचा रस ऍसिड रिफ्लक्स, सर्दी आणि पाचन समस्या दूर करतो. पावसाळ्यात श्वास घेण्यास त्रास होत असेल तर लिचीचे सेवन करा. याशिवाय, ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम करतं.
पावसाळ्यात तुम्ही दररोज 1 नाशपती खाल्ल्यास ते तुमची प्रतिकारशक्ती मजबूत करतं. फायबरयुक्त असलेल्या या हंगामी फळाचा आहारात समावेश करून स्वत:ला निरोगी ठेवा.
पावसाळ्यात सफरचंद आणि डाळिंब या फळांचं सेवन केल्यास ते अनेक प्रकारे फायदेशीर ठरतं. भरपूर लोह आणि विविध जीवनसत्त्वे असलेलं सफरचंद शरीरातील लोहाची कमतरता टाळतं. तर डाळिंब तुम्हाला पावसाळ्यात तुम्हाला फिट ठेवते.