प्ले स्टोअरमध्ये अशी बरीच ॲप्स आहेत ज्यामुळे प्रवासातील त्रासापासून सुटका होऊ शकते. त्यातही मोशन सिकनेसपासून सुटका करण्यासाठी काइनस्टॉप (KineStop) हे ॲप खूपच उपयुक्त आहे. या ॲपच्या मदतीनं युजर्सला कार सिकनेसपासून आराम मिळू शकतो. हे ॲप गाडीच्या वेगाच्या दिशेनुसार स्क्रीनवर एक फिरणारा डॉट दाखवतं. मोशन सिकनेसची समस्या कमी करण्यास मदत व्हावी, यासाठी डॉट कारच्या वेगाच्या विरुद्ध दिशेनं जाताना दिसतो.
advertisement
केस कलर करायचे आहेत पण केमिकलची भीती वाटते? हा DIY कॉफी मास्क ट्राय करून पाहाच
अशी करा मोशन सिकनेसची समस्या दूर
- गुगल प्ले स्टोअरमध्ये जाऊन Kinestop डाउनलोड करा.
- यानंतर ॲपवर टॅप करून Allow display over other apps ऑप्शन ऑन करा.
- यानंतर पुन्हा ॲपमध्ये जाऊन प्ले बटणावर टॅप करा.
- तुम्ही तुमच्या आवडीनुसार या ॲपची थीम बदलू शकता.
- तुम्ही गाडीमध्ये प्रवास करीत असताना काइनस्टॉप ऑटोमॅटिक सुरू करण्यासाठी, तुम्ही वरच्या बाजूला उजवीकडे दिलेल्या कॉगव्हिल आयकॉनवर टॅप करू शकता व व्हेईकल बॉक्समध्ये ऑटो स्टार्ट ऑन करू शकता.
आयफोन, आयपॅडमध्ये मोशन सिकनेससाठी सेटिंग
आयफोनमध्ये देखील मोशन सिकनेससाठी स्वतंत्र सेटिंग असेल. ॲपल कंपनीनं त्यांच्या iOS 18 अपडेटमध्ये ‘व्हेईकल मोशन क्यू’ हे फीचर देण्याची घोषणा केलीय. हे फीचर लवकरच आणलं जाऊ शकते. कंपनीनं दावा केल्यानुसार संशोधनात असं स्पष्ट झालं आहे की, अनेकदा चालत्या वाहनात आयफोन किंवा आयपॅड वापरताना युजर्सचे काय पाहतो याचा त्याच्या शरीराला नेमकं काय जाणवतं याच्याशी समतोल नसल्यामुळे उलटी होते. त्यामुळेच आता iOS 18 अपडेट आल्यानंतर हे फीचर आयफोन व आयपॅड दोन्हीमध्ये देण्यात येणार आहे.
WhatsAppने लॉन्च आजवरचं सर्वांत भन्नाट फीचर! पाहा काय वेगळं असणार
प्रवासादरम्यान तुम्हालाही मोशन सिकनेसचा त्रास होत असेल तर तुम्हीही तुमच्या मोबाईलच्या मदतीनं ही समस्या दूर करून आरामदायी प्रवास करू शकता.