आपल्या पोस्टमध्ये अभिजीत म्हणतो, ‘आज शूटिंगचा साडेआठचा कॉल टाईम होता. साडेसात वाजता घरून गुगल मॅप बघून निघालेलो मी दीड तासापासून घोडबंदर रोडवरच्या घाटाच्याही बराच आधी असलेल्या शेल पेट्रोल पंपच्या इकडे बंपर टू बंपर ट्रॅफिक मध्ये अडकलो आहे. ट्राफिक कधी सुटणार ? शूटिंगला आपण कधी पोहोचू शकणार ? हे माहीत नाही, ह्या केऑटिक सिच्युएशनमध्ये घाणेरड्या रस्त्यांमुळे आणि बेशिस्त ट्रक ड्रायव्हर्समुळे, एखादा ट्रक किंवा ट्रॉलर उलटून त्याच्याखाली माझा मृत्यू झालाच आणि माझ्या पश्चात त्या स्पॉटला चुकून माकून माझं नाव द्यायचा विचार झालाच तर माझा उल्लेख, "अभिनेता" अभिजीत केळकर असा न करता "चांद्र मोहीमवीर" अभिजीत केळकर असा करावा ही विनंती...’
advertisement
'कलाकारांनाही मेगाब्लॉकचा फटका! 5 तास ट्रॅफिकमध्ये अडकल्या सुप्रिया पाठारे'
जसंजसं ठाणं वाढू लागलंय तसतसं ठाण्याची ओळख बदलू लागलीये. सुरूवातीला मढ आयलंड आणि गोरेगाव फिल्मसिटी पुरता मर्यादित असलेलं मराठी मालिकांचं शुटिंग घोडबंदर परिसरात होऊ लागलंय. अनेक मोठे स्टुडिओज या भागात उभारले गेलेत. अनेक अभिनेते, दिग्दर्शक शुटींगसाठी ठाणे गाठत असतात. मात्र घोडबंदर रोडच्या वाहतूक कोंडीमुळे त्यांनी ठाण्यापासून दूर राहणं पसंद केलंय.
खड्डेमय घोडबंदरचा उल्लेख ‘अंतराळ’
संतापलेल्या अभिजितने काही दिवसांपूर्वी अशीच एक पोस्ट फेसबुकवर टाकली होती. ‘ठाण्यातील एक अतिशय महत्त्वाचा आणि बारा महिने, चोवीस तास रहदारीचा असलेला घोडबंदर रोड... गेली अनेक वर्ष, त्यावरील अत्यंत निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांच्या कामामुळे चर्चेत असतो...दोन्ही बाजूच्या गाड्या, heavy ट्रक्स, ट्रॉलर्स रोज येऊन घाटात अडतातच, त्यात इथे स्ट्रीट लाइट्सही नाहीत त्यामुळे अनेकदा अपघातही होतात, त्यामुळे वाहनं अडतात ते वेगळंच... रोज अक्षरशः जीव मुठीत घेऊनच इथून प्रवास करावा लागतो... मी ही काही वर्षांपूर्वी याच ठिकाणी, बाईक accident मधे, मरता मरता वाचलो होतो पण अजूनही परिस्थिती बदललेली नाही... निवडणुका आल्या-गेल्या, येतील-जातील, तसेच जीवही गेले, जातील आणि अंतराळातला हा प्रवास असाच अव्याहत सुरू राहील.’