कलाकारांनाही मेगाब्लॉकचा फटका! 5 तास ट्रॅफिकमध्ये अडकल्या सुप्रिया पाठारे, VIDEO

Last Updated:

मध्य रेल्वेच्या मेगा ब्लॉकचा कलाकारांना देखील याचा फटका बसला आहे. प्रसिद्ध अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांनी व्हिडीओ शेअर करत त्यांना झालेला त्रास सांगितला आहे.

अभिनेत्री सुप्रिया पाठारेंना मेगाब्लॉकचा फटका
अभिनेत्री सुप्रिया पाठारेंना मेगाब्लॉकचा फटका
मुंबई : मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेनला ब्रेक देण्यात आला आहे. मध्य रेल्वेवर तब्बल 63 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. धीम्या गतीने धावणाऱ्या लोकल सुरू ठेवण्यात आल्या आहेत. मात्र त्यांची संख्या फार कमी आहे. एक लोकल गेल्यानंतर दुसरी लोकल येण्यासाठी जवळपास अर्धा ते एक तास लागत आहे. लोकलं बंद असल्यानं लोकांनी बाय रोड जाणं पसंत केलं आहे. पण यामुळे रस्त्यावर देखील प्रचंड ट्रॅफिक झालं आहे. मुंबईतील बऱ्याच ठिकाणी ट्रॅफिक जाम झालं आहे. ज्याचा सर्वांचा प्रचंड त्रास सहन करावा लागला आहे.
मध्य रेल्वेच्या मेगा ब्लॉकचा कलाकारांना देखील याचा फटका बसला आहे. प्रसिद्ध अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांनी व्हिडीओ शेअर करत त्यांना झालेला त्रास सांगितला आहे. त्याचप्रमाणे गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन त्यांनी केलं आहे.
advertisement
अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांनी त्यांच्या गाडीतून व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात त्या सांगतायत, माझं शुटींग मढला असतं. मी ठाण्याहून सकाळी 8 वाजता निघालेये आणि आता 12.30 झालेत तरीही मी मढला पोहोचले नाहीये. पाच तास झालेत. घोडबंदर रोज पूर्णपणे जाम आहे. एका जागी एक एक तास गाड्या थांबवून ठेवत आहेत. मुलूंड ऐरोली ब्रिजच्या इथेही कुठेतरी कंटेनर पलटी झाल्यानं तिथेही ट्रॅफिक आहे. त्यामुळे तुमचं महत्त्वाचं काही काम नसेल तर प्लिज घराबाहेर पडू नका कारण खाण्या पिण्याचे खूप हाल होत आहेत.
advertisement
सुप्रिया पाठारे पुढे म्हणाल्या, महत्त्वाची गोष्ट नाटक वाल्यांसाठी ज्याच्या नाटकाचे प्रयोग असतील तर त्यांनी प्लिज वेळेत निघा कारण सगळीकडून खूप ट्रॅफिक आहे. कोणी कुठेही अडकू नये यासाठी काळजी घ्या.
advertisement
अभिनेत्री सुप्रिया पाठारे सध्या स्टार प्रवाहवरील साधी माणसं या मालिकेत काम करत आहेत. मालिकेत त्यांनी सासूची भुमिका साकारली आहे. त्याचप्रमाणे नुकताच त्यांचा नाच गं घुमा हा सिनेमा देखील रिलीज झाला आहे. ज्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
मराठी बातम्या/मनोरंजन/
कलाकारांनाही मेगाब्लॉकचा फटका! 5 तास ट्रॅफिकमध्ये अडकल्या सुप्रिया पाठारे, VIDEO
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement