TRENDING:

Maratha Tourism: शिवनेरी ते रायगड, किल्ल्यांना जोडणार मराठा पर्यटन ट्रेन, कधीपासून होणार सुरू?

Last Updated:

Maratha Tourism: भारतीय रेल्वे लवकरच छत्रपती शिवाजी महाराज आणि गौरवशाली मराठा पर्यटन गाडी सुरू करत आहे. ही गाडी रायगड ते पन्हाळगडपर्यंत धावणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कोल्हापूर: शिवप्रेमी आणि पर्यटकांसाठी खूशखबर आहे. भारतीय रेल्वे लवकरच छत्रपती शिवाजी महाराज आणि गौरवशाली मराठा पर्यटन गाडी सुरू करत आहे. ही गाडी 9 जूनपासून सुरू होणार आहे. या योजनेतून करवीर निवासिनी आंबाबाई, ज्योतिर्लिंग दर्शनासह शिवनेरी, रायगडाची सफर करता येणार आहे. तसेच राज्यातील इतर सांस्कृतिक आणि तीर्थस्थानांचे दर्शन होणार आहे.
शिवनेरी ते रायगड, किल्ल्यांना जोडणार मराठा पर्यटन ट्रेन, कधीपासून होणार सुरू?
शिवनेरी ते रायगड, किल्ल्यांना जोडणार मराठा पर्यटन ट्रेन, कधीपासून होणार सुरू?
advertisement

छत्रपती शिवरायांशी संबंधित ठिकाणांना भेट

छत्रपती शिवाजी महाराज सर्किट रेल्वेतून प्रवाशांना शिवजन्मस्थळ आणि शिवरायांचे किल्ले आणि विजयी मोहिमांशी संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष जाण्याची संधी मिळणार आहे. या अनोख्या प्रवासासाठी पर्यटकांना विशेष यात्रा पॅकेज मिळणार आहे. 'आईआरसीटीसी द्वारा संचालित भारत गौरव टुरिस्ट ट्रेन आहे. विशेष मराठा पर्यटन उपक्रमांतर्गत छत्रपती शिवाजी महाराज सर्किटसह मराठा साम्राज्याच्या गौरवशाली इतिहास पाहण्यासाठी संधी देशभरातील प्रवाशांना मिळणार आहे.

advertisement

जय गणेश! ‘दगडूशेठ’ मंदिरात शहाळे महोत्सव, वैशाख पौर्णिमेला 5000 शहाळ्यांचा महानैवद्य, Video

प्रवास किती दिवसांचा?

मराठा पर्यटन ट्रेनचा प्रवास सहा दिवसांचा असणार आहे. या प्रवासात विशेष पर्यटन मार्गात रायगड, शिवनेरी, प्रतापगड आणि पन्हाळगडाचा समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तसेच दादर आणि ठाणे स्थानकावरून ही रेल्वे 9 जूनला सुटेल. पॅकेजमध्ये स्लीपर, एसी तृतीय श्रेणी, एसी द्वितीय श्रेणीतून प्रवासाची सोय आणि हॉटेलमध्ये मुक्कामाची सुविधा आहे.

advertisement

ही ठिकाणे पाहता येणार

मराठा पर्यटन ट्रेनच्या माध्यमातून शिवजन्मस्थळ शिवनेरी, पुणे परिसरातील लाल महाल, कसबा गणेश मंदिर, शिवसृष्टी, किल्ले रायगड, भीमाशंकरचे ज्योतिर्लिंग मंदिर, किल्ले प्रतापगड, कोल्हापूरची अंबाबाई मंदिर आणि किल्ले पन्हाळगड पाहता येईल.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Travel/
Maratha Tourism: शिवनेरी ते रायगड, किल्ल्यांना जोडणार मराठा पर्यटन ट्रेन, कधीपासून होणार सुरू?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल