जय गणेश! ‘दगडूशेठ’ मंदिरात शहाळे महोत्सव, वैशाख पौर्णिमेला 5000 शहाळ्यांचा महानैवद्य, Video

Last Updated:

Dagdusheth Ganpati: पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिरात वैशाख पौर्णिमेनिमित्त शहाळे महोत्सव साजरा करण्यात आला. तब्बल 5 हजार शहाळ्यांचा महानैवद्य बाप्पांना अर्पण केला.

+
जय

जय गणेश! ‘दगडूशेठ’ मंदिरात शहाळे महोत्सव, वैशाख पौर्णिमेला 5000 शहाळ्यांचा महानैवद्य, Video

प्राची केदारी, प्रतिनिधी
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात वैशाख पौर्णिमेनिमित्त ‘शहाळे महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले. या उत्सवाच्या निमित्ताने तब्बल 5 हजार शहाळ्यांचा महानैवेद्य बाप्पांना अर्पण करण्यात आला. मंदिर ट्रस्टच्या वतीने पार पडलेल्या या अनोख्या उपक्रमात पर्यावरणपूरक सजावट आणि भक्तीभावाने भारलेला माहोल पाहायला मिळाला.
पुष्टिपती विनायक जयंती
पुराणांमध्ये वर्णन केलेल्या पुष्टिपती विनायक अवताराच्या स्मरणार्थ हा महोत्सव दरवर्षी साजरा केला जातो. दुर्मती राक्षसाच्या संहारासाठी शंकर-पार्वती यांच्या इच्छेने गणेशांनी घेतलेल्या या अवताराचा उल्लेख ‘श्रीगणेश पुराण’ व ‘मुद्गल पुराण’ यामध्ये आढळतो. वैशाख शुद्ध पौर्णिमेला झालेल्या या अवतारामुळे हा दिवस ‘पुष्टिपती विनायक जयंती’ म्हणून ओळखला जातो.
advertisement
भक्तिगीतांची गायनसेवा
सकाळी सूर्योदयाच्या वेळी विशेष पूजा व अभिषेक, तसेच गणेशयाग करण्यात आला. पहाटे प्रसिद्ध गायिका सानिया पाटणकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भक्तिगीतांची गायनसेवा अर्पण केली. गाभारा आणि सभामंडप शहाळ्यांची आकर्षक रचना व हिरवळीने सजवण्यात आला होता.
advertisement
रुग्णांना शहाळ्यांचा प्रसाद
या दिवशी देशभरात सुख, समृद्धी, आरोग्य, पावसाचे आगमन, दुष्काळ निवारण आणि शेतकऱ्यांच्या समस्या दूर होण्यासाठी प्रार्थना करण्यात आली. या धार्मिक सोहळ्यानंतर दुसऱ्या दिवशी ससून रुग्णालयातील रुग्णांना शहाळ्यांचा प्रसाद वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी दिली.
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/Temples/
जय गणेश! ‘दगडूशेठ’ मंदिरात शहाळे महोत्सव, वैशाख पौर्णिमेला 5000 शहाळ्यांचा महानैवद्य, Video
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement