पावसाळा प्राण्यांच्या मॅटिंग पीरियडसाठी (प्रजनन) महत्त्वाचा असतो. यादरम्यान प्राणी चिडचिड आणि आक्रमक होतात. परिणामी, पर्यटकांवर हल्ल्याची दाट शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्यातील 3 महिने (जुलै-सप्टेंबर) गौताळा अभयारण्य पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती वन विभागाकडून देण्यात आली.
Tourist places in Nashik: पावसाळ्यात नाशिकमधील इथं नाही फिरला तर कुठे फिरला! 5 Hidden ठिकाणं
advertisement
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्याच्या भागात गौताळा अभयारण्याची स्थापना 1986 मध्ये झाली. 17 गावातील वनक्षेत्राचा यात समावेश आहे. 260 चौ. किमी क्षेत्रात हे अभयारण्य पसरले आहे. पावसाळ्यात हे अभयारण्य पाहण्यासारखे असते. परंतु, ऐन पावसाळ्यात हे अभयारण्य पर्यटकांसाठी बंद ठेवले जाते. त्यामुळे पर्यटकांचा हिरमोड होत असल्याच्या भावना पर्यटकांनी व्यक्त केल्या.
पावसाळा हा प्राण्यांच्या मॅटिंग पीरियडसाठी खास मानला जातो. या मॅटिंग पीरियडमध्ये पक्षी किंवा प्राणी चिडचिड करतात. पर्यटकांनी अशा वेळी त्यांच्या मॅटिंग पीरियडमध्ये व्यत्यय आणला तर ते हल्ला करतात. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती वनपाल समाधान पाटील यांनी दिली आहे.