TRENDING:

ट्रेनमध्ये टॉयलेट खराब, टीटीही करतोय मनमानी किंवा जेवणही खराब, याठिकाणी करा तक्रार, 30 मिनिटांत होणार समाधान

Last Updated:

यासोबतच जर तुमचा कॉल लागत नसेल किंवा तुमच्या मोबाईलला नेटवर्क मिळत नसेल तर ट्रेनमध्ये आरपीएफचे जवानही असतात. तुम्ही त्यांच्याशीही संपर्क करू शकतात. तेसुद्धा तुम्हाला मदत करतील.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
शिखा श्रेया, प्रतिनिधी
फाईल फोटो
फाईल फोटो
advertisement

रांची : अनेकदा पाहायला मिळते की, ट्रेनमध्ये प्रवास करत असताना तुम्हाला शौचालय खूप अस्वच्छ मिळते. तुम्हाला वापर तर करावा लागले, मात्र, घाण जास्त असल्याने तुम्हाला सहन करावे लागते. यासोबतच जेवणही खराब आणि निकृष्ट मिळते. त्यामुळे अनेकदा व्यवस्थेचा राग येतो. मात्र, आता चिंता करण्याचे कारण नाही. तुम्ही फक्त 30 मिनिटाच्या आत तुमची समस्या सोडवू शकतात.

advertisement

रांची रेल्वे विभागाचे वरिष्ठ डीसीएम निशांत कुमार यांच्याशी लोकल18 च्या टीमने संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, अनेक प्रवाशांना स्वच्छतागृहे अस्वच्छ किंवा खराब झालेले अन्न आढळले. याशिवाय, काहीवेळा असे घडते की समोरचा प्रवासी तुमच्याशी गैरवर्तन करतो किंवा टीटी कधीकधी मनमानी दंड वसूल करतो. असा अनुभव आल्यावर तुम्ही एका हेल्पलाइन नंबरवर कॉल करून ही सर्व माहिती देऊ शकता.

advertisement

प्रवासादरम्यान, तुम्हाला कोणत्याही त्रासाला सामोरे जावे लागत असेल तर तुम्ही 138 नंबरवर कॉल करावा. तुम्हाला त्वरित प्रतिसाद मिळेल. मात्र, तुमचा कॉल लागत नसेल तर तुम्ही रांची रेल्वे मंडळाच्या हेल्पलाइन नंबर 182 यावर किंवा 18003451091 यावर कॉल करू शकतात. पुढील 30 मिनिटात तुमच्या समस्येचे निदान केले जाईल.

पाहुण्यांना चिकन खाऊ घालणे पडले महागात, नंतर सासू-सूनेनं कमालच केली, नेमकं काय घडलं?

advertisement

यासोबतच जर तुमचा कॉल लागत नसेल किंवा तुमच्या मोबाईलला नेटवर्क मिळत नसेल तर ट्रेनमध्ये आरपीएफचे जवानही असतात. तुम्ही त्यांच्याशीही संपर्क करू शकतात. तेसुद्धा तुम्हाला मदत करतील.

संपूर्ण टीम असते कार्यरत -

अनेकदा लोक या गोष्टींना गांभीर्याने घेत नाही. असा विचार करतात की, तक्रार केल्याने नेमकं काय होईल. मात्र, तुम्हाला सांगू इच्छितो की, याठिकाणी हेड क्वार्टरमध्ये एक संपूर्ण टीम कार्यरत असते, जी हेल्पलाइन नंबर्सला खूप गांभीर्याने घेते. तसेच तत्काळ समस्येच्या निदानासाठी 24 तास कार्यरत असते. मात्र, अनेकदा प्रवासी ही बाब गांभीर्याने घेत नाहीत. त्यामुळे ट्रेनला स्वच्छ आणि सुरक्षित करण्यासाठी प्रवाशांचे योगदानही महत्त्वाचे आहे. त्यांनी पुढे येऊन नक्की तक्रार करायला हवी, अशी माहितीही त्यांनी दिली.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Travel/
ट्रेनमध्ये टॉयलेट खराब, टीटीही करतोय मनमानी किंवा जेवणही खराब, याठिकाणी करा तक्रार, 30 मिनिटांत होणार समाधान
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल