मुंबई - देशातील पर्यटन स्थळांचा विचार केल्यावर महाराष्ट्रातील कोकणाचा प्रामुख्याने विचार केला जातो. मोठ्या प्रमाणात पर्यटक दरवर्षी कोकणात भेट देतात. आता लवकरच दिवाळीच्या सुट्ट्या लागणार आहेत. त्यामुळे अनेक जण दिवाळीत फिरायला जाण्याचे नियोजन करत असतील. तुम्हीही दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये फिरायला जाण्याचे नियोजन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. आपण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनस्थळाबाबत जाणून घेणार आहोत.
advertisement
पांढरी वाळू, स्वच्छ सुंदर किनारे, नयनरम्य निसर्ग याचा आनंद घ्यायचा म्हटला की, डोळ्यांसमोर कोकणचे चित्र येते. सिंधुदुर्गातील पर्यटन गोव्याच्या तुलनेत पर्यटकांना आकर्षित करणारे आहे. निसर्गाची खाण म्हटल्यावर कोकणाकडे पाहिले जाते. सिंधुदुर्गातील मालवण म्हटल्यावर सिंधुदुर्ग किल्ला हे एक महत्त्वाचे पर्यटनस्थळ आहे. या किल्ल्याला दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात.
स्वस्तात मस्त डिझायनर पणत्या, व्हरायटीही भरपूर, मुंबईतील हे मार्केट आहे बेस्ट
मालवणमधील पर्यटकांचे आकर्षण असण्याची कारणे म्हटल्यास या ठिकाणी स्वच्छ व सुंदर किनारपट्टी, सिंधुदुर्ग किल्ला, जुन्या ऐतिहासिक वस्तू, वॉटर स्पोर्ट्स, तारकर्ली बीच, मालवण जेटी, रॉक गार्डन, चिवला बीच, देवाबाग बीच त्सुनामी आयलंड अशी विविध प्रसिद्ध ठिकाणे असल्याने पर्यटकाचा ओघ मालवणला जास्त असतो.
समुद्र किनारा लाभल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मासे खाणाऱ्या खवय्याची संख्या जास्त असते. त्यामुळेच सिंधुदुर्गला गोव्याच्या तुलनेत मालवणला विकेंडच्या सुट्ट्यांना पर्यटकाची गर्दी पाहायला मिळते. तुम्हीदेखील दिवाळीच्या सुट्ट्यात फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही मालवणला नक्की भेट देऊ शकता.