जयपुर : ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. रेल्वे प्रवासी आता आपल्या मोबाईलवरुनच प्लॅटफॉर्म तिकीट आणि जनरल तिकीट बुक करू शकतात. आधी रेल्वे लाइनपासून कमीत कमी 20 मीटर दूर अंतरावरच तिकीट काढता येत होतं. मात्र, प्रवाशांची यातून सुटका होणार आहे.
रेल्वेचे यूटीएस अॅप हे जनतेमध्ये लोकप्रिय होणार आहे. प्रवाशांना तिकीट काढणे सोपे जावे, यासाठी प्रमुख स्थानकांवर वाणिज्य विभागाचे कर्मचारी प्रवाशांना यूटीएस अॅपची माहिती देत आहेत. यूटीएस अॅपची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी रेल्वे बोर्डाने नियमांमध्ये बदल केले आहेत.
advertisement
प्लॅटफॉर्मवर उभे राहून तिकीट काढा
नवीन बदलानुसार, आता प्रवाशी यूटीएस अॅपच्या माध्यमातून रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर उभे राहून जनरल तिकीट किंवा प्लॅटफॉर्म तिकीट काढू शकतात. आधी रेल्वे लाइनने कमीत कमी 20 मीटर दूर अंतरावरच हे तिकीट काढता येत होते.
यूटीएस अॅपमुळे कोट्यवधींचे उत्पन्न -
जयपूर विभागातील सर्व स्थानकांवर ऑनलाइन अनारक्षित रेल्वे तिकीट बुकिंगसाठी यूटीएस ऑन मोबाइल अॅप सुविधा उपलब्ध आहे. वाणिज्य व्यवस्थापक कृष्ण कुमार मीना यांनी सांगितले की, तिकीट बुक करण्यासाठी यूटीएस ऑन मोबाईल अॅप हे रेल्वे प्रवाशांमध्ये लोकप्रिय होऊ लागले आहे. अनेक प्रवासी या मोबाईल ॲपचा वापर करत आहेत. अॅपद्वारे जनरल रेल्वे तिकीट विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे.
भयावह घाट..., म्हणे, गाडीसमोर येतात भूतं; अनेकांना आला जीवघेणा अनुभव, कुठे आहे हे ठिकाण?
27 लाख प्रवाशांनी केला वापर -
फक्त जयपूर मंडळाचा विचार केला असता 1 जानेवारी 2024 पासून 30 जून 2024 पर्यंत 26 लाख 86 हजारपेक्षा अधिक जणांनी यूटीएस अॅपवरुन तिकिट काढले आहे. यामुळे रेल्वेला 5 कोटी 26 लाख 84 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
मोबाइल ऑफलाइन असेल तरी दिसेल तिकीट -
यूटीएस अॅपवरुन तुम्ही अनारक्षित तिकीट, सीझन तिकीट, सीझन तिकीट नूतनीकरण, पेपर तिकीट आणि पेपरलेस तिकीट दोन्ही बुक करू शकता. तुम्ही बुक केलेल्या तिकिटांचे तपशील देखील तपासू शकता. रेल्वेच्या म्हणण्यानुसार, तुमचा मोबाईल हेच तुमचे तिकीट असेल. तसेच तुमचा मोबाइल ऑफलाइन मोडमध्ये असेल तर हे तिकीट तुमच्या मोबाईलवर दिसणार आहे.