TRENDING:

आता रस्त्यावरून चालण्याची गरजच नाही! मीरा-भाईंदरमध्ये फिरणार पॉड टॅक्सी

Last Updated:

पॉड टॅक्सी आणि रस्त्यावरील वाहतूक एकमेकांपासून वेगळे असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यास मदत होते. हा पर्याय पर्यावरणपूरक असून यातून वेळेची बचतही होते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ठाणे: येत्या काही वर्षांत मीरा-भाईंदर येथील नागरिकांची वाहतूक कोंडीच्या समस्येतून सुटका होण्याची शक्यता आहे. कारण, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहराला लवकरच अत्याधुनिक वाहतूक सुविधा मिळणार आहे. मीरा-भाईंदरमध्ये पुढील काही वर्षांत पॉड टॅक्सी सेवा सुरू केली जाणार आहे. मेट्रोनंतर वाहतूक क्षेत्रात हा प्रकल्प एक मोठं पाऊल मानला जात आहे.
आता रस्त्यावरून चालण्याची गरजच नाही! मीरा-भाईंदरमध्ये फिरणार पॉड टॅक्सी
आता रस्त्यावरून चालण्याची गरजच नाही! मीरा-भाईंदरमध्ये फिरणार पॉड टॅक्सी
advertisement

या प्रकल्पासाठी एप्रिल महिन्यापासून न्यूट्रॉन ईव्ही कंपनीने मीरा-भाईंदरमध्ये सर्वेक्षण सुरू केलं आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली याचा अहवाल सादर करण्यात आला.

अहवालानुसार, शहरातील 33 किलोमीटर परिसर रेल्वे आणि मेट्रो स्थानकांशी जोडण्याची गरज आहे. हा प्रकल्प पहिल्या टप्प्यात जेपी इन्फ्रा ते गोल्डन नेस्टपर्यंत या 14 किलोमीटर अंतरावरील मार्गावर सुरू केला जाईल. संपूर्ण प्रकल्पासाठी सुमारे एक हजार कोटी रुपये खर्च येण्याची शक्यता आहे. पण, पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) मॉडेलवर आधारित असल्याने राज्य सरकार किंवा महानगरपालिकेला कोणताही आर्थिक भार सहन करावा लागणार नाही.

advertisement

Ropeway : रस्त्याने चालण्याची गरजच नाही! आरे ते फिल्मसिटी प्रवास हवेतून शक्य

गुजरातमधील वडोदरा येथे अशा प्रकारचा प्रकल्प यापूर्वीच हाती घेण्यात आला आहे. आता त्याच धर्तीवर ठाणे आणि मीरा-भाईंदरमध्ये प्रायोगिक तत्वावर ही पॉड टॅक्सी सेवा सुरू करण्यात येत आहे.

सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारची मान्यता आणि इतर आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतर, मार्च 2026 पासून बांधकाम सुरू होईल. हे काम दोन वर्षांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. हा प्रकल्प मीरा-भाईंदरच्या विकासाच्या दृष्टीने फार महत्त्वाचा ठरेल.

advertisement

पॉड टॅक्सी म्हणजे काय?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सोयाबीनच्या दराबद्दल नवी अपडेट, आज काय मिळाला भाव?
सर्व पहा

ही एक ऑटोमॅटिक आणि ड्रायव्हरलेस लहान इलेक्ट्रिक टॅक्सी असते. ती उंच ट्रॅकवर चालते. साधारणपणे एका पॉड टॅक्सीमधून चार ते आठ प्रवासी वाहून नेता येतात. पॉड टॅक्सी आणि रस्त्यावरील वाहतूक एकमेकांपासून वेगळे असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यास मदत होते. हा पर्याय पर्यावरणपूरक असून यातून वेळेची बचतही होते. पॉड टॅक्सी जलद, सुरक्षित आणि स्मार्ट वाहतूक पर्याय म्हणून उदयास येत आहेत.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Travel/
आता रस्त्यावरून चालण्याची गरजच नाही! मीरा-भाईंदरमध्ये फिरणार पॉड टॅक्सी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल