Ropeway : रस्त्याने चालण्याची गरजच नाही! आरे ते फिल्मसिटी प्रवास हवेतून शक्य
- Published by:Vrushali Kedar
- local18
Last Updated:
Ropeway : सध्या मुंंबईमध्ये अनेक ठिकाणी मेट्रोचे वेगात काम सुरू आहे. मुंबई शहर आणि उपनगरांतील कनेक्टिव्ही आणखी चांगली करण्यासाठी मेट्रोचा वापर केला जाणार आहे.
मुंबई: राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराला लागून असलेल्या उपनगरांमधून मुख्य शहरात येण्यासाठी नागरिकांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. ही समस्या सोडवण्यासाठी मुंबई मुख्य शहर आणि उपनगरांना जोण्यासाठी पर्यायी वाहतूक मार्गांची निर्मिती सुरू आहे. मेट्रो 3 भुयारी मार्ग हा त्यापैकीच एक आहे. या मार्गावरील सर्वांत पहिले स्टेशन असणाऱ्या आरे जेव्हीएलआर स्टेशनला आता रोपवे जोडला जाणार आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, या रोपवे मुळे फिल्मसिटीपर्यंत सहज प्रवास करणे शक्य होईल. रोपवेमुळे पर्यटकांना पर्यटनस्थळी आणि नोकरदारांना आपल्या कामाच्या ठिकाणी पोहोचणे सुलभ होईल. आरे मेट्रो स्टेशन ते फिल्मसिटीपर्यंतचा रोपवे साधारण दोन ते तीन किलोमीटर लांबीचा असेल. त्याच्या मदतीने एका दिशेला एका तासात तोन ते तीन हजार प्रवासी प्रवास करू शकतील.
advertisement
रोपवेमुळे रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. भुयारी मेट्रोतील प्रवासीसंख्या वाढवण्यास देखील मदत होईल. भुयारी मेट्रोतून आलेले प्रवासी रोपवेने थेट फिल्मसिटीमध्ये जाऊ शकतील. त्यामुळे त्यांना रस्त्याने प्रवास करावा लागणार नाही. हा रोपवे सार्वजनिक आणि खासगी भागीदारी तत्त्वावर उभारला जाणार, असल्याची माहिती समोर आली आहे. या मार्गाचे नियोजन, बांधकाम, विकास, संचालन हे एका खासगी कंपनीद्वारे केले जाईल व त्यानंतर ती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडला (एमएमआरसीएल) हस्तांतरित केली जाईल.
advertisement
सध्या मुंंबईमध्ये अनेक ठिकाणी मेट्रोचे वेगात काम सुरू आहे. मुंबई शहर आणि उपनगरांतील कनेक्टिव्ही आणखी चांगली करण्यासाठी मेट्रोचा वापर केला जाणार आहे. मेट्रोच्या मदतीने प्रवाशांचा वेळ वाचू शकतो.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 04, 2025 10:09 AM IST
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
Ropeway : रस्त्याने चालण्याची गरजच नाही! आरे ते फिल्मसिटी प्रवास हवेतून शक्य


